लखनऊ | ताडी प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही. तसेच ताडी ही गंगेच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध आहे, असा दावा बसपाचे उत्तर प्रदेशमधील प्र...
लखनऊ | ताडी प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही. तसेच ताडी ही गंगेच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध आहे, असा दावा बसपाचे उत्तर प्रदेशमधील प्रमुख नेते भीम राजभार यांनी केला आहे.
भीम राजभार यांनी एका सर्वाजनिक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी राजभार यांनी शेतामध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या ताडीचं महत्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं.
आमच्या समाजातील अनेकजण भरपूर ताडी पितात. याच कारणामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही, असंही भीम राजभार म्हणाले.