वडवणी । प्रतिनिधी वडवणी येथील गट.नंबर 636 मधील शासकीय पांदण रस्ता खुला करावा अशी मागणी मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांनी मा...
वडवणी । प्रतिनिधी
वडवणी येथील गट.नंबर 636 मधील शासकीय पांदण रस्ता खुला करावा अशी मागणी मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार, वडवणी यांना लेखी निवेदन देऊन केली होती तरी तहसील प्रशासनाने याठिकाणी भेट देऊन पंचनामा करून हा पांदणरस्ता असल्याचे सिध्द झाल्याने हा पांदणरस्ता प्रशासनाकडून मोकळा करून खुला करण्यात आला आहे तरी मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांच्या तक्रारीला यश आले आहे. वडवणी येथील वडवणी ते हरिश्चंद्र पिंपरी रोडवर गट नंबर 636 मध्ये शासकीय पांदण रस्त्यावर अतिक्रमण करून तिरूपती प्लाँटिंगचा व्यवसाय सुरू केलेला होता यामध्ये मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब बीड,मा.तहसीलदार वडवणी यांना लेखी तक्रार करून या गट नंबर 636 मधील शासकीय पांदणरस्तावरील अतिक्रमण काढून हा पांदणरस्ता खुला करावा नसता तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तरी यावर तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांना आदेश देऊन प्रत्यक्ष पहाणी करून अहवाल देण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी पहाणी करून अहवाल दिला कि सदर गट नंबर मधील पांदणरस्ता नकाशा मध्ये दिसून येत असुन याठिकाणी साफसफाई केली आहे असा अहवाल दिला होता तरी तहसील प्रशासनाने या प्रकरणाची नियमानुसार चौकशी करून गट नंबर 636 मधील शासकीय पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून हा पांदणरस्ता खुला केला आहे तरी मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांनी यासाठी जिल्हा, तालुका प्रशासनस्तरावर सतत पाठपुरावा करून वेळ प्रसंगी मनसेच्या वतीने आंदोलन करण्याची तयारी दर्शविली होती तरी त्यांच्या या मागणीला यश आले आहे.