किल्ले धारूर । प्रतिनिधीः- तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार कार्यरत होते परंतु नायब तहसीलदार सुहास हजारे व विटेकर यांची बदली झाल्यामुळे सध...
किल्ले धारूर । प्रतिनिधीः-
तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार कार्यरत होते परंतु नायब तहसीलदार सुहास हजारे व विटेकर यांची बदली झाल्यामुळे सध्या एकाच नायब तहसीलदार वर धारूर तहसील कार्यालयाचा कारभार चालणार आहेयामुळे प्रशासनावर तान येणार असून सर्वसामान्यांच्या कामाला विलंब लागणार आहे याबाबत लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष होत आहे. धारूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विटेकर यांची काल गेवराई येथे बदली झाल्याने आता या कार्यालयात फक्त रामेश्वर स्वामी हे एकच नायब तहसीलदार राहिले आहेत अनेक विभाग आणि एकच तहसीलदार असल्याने प्रशासनावर याचा ताण येणार आहे तहसील कार्यालयात लिपिक तलाठी ,नायब तहसीलदार यांची पदे रिक्त असल्याने याच प्रश्नावर ताण येत आहे यामुळे सर्व सामान्य व्यक्तींची कामे होण्यास उधित लागणार आहे तलाठ्यांचे ही पदे रिक्त असल्याने एकाच तलाठ्याला चार चार सज्जे सांभाळावे लागत आहे.रिक्तपदे भरण्याबाबत सत्ताधारी आमदार यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे लवकरात लवकर रिक्त पदे भरून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना न्याय देण्याची मागणी होत आहे.
-------------------