संदिपकुमार ब्रह्मेचा/नाशिक : शहरातील केवळ नामवंत नव्हे तर उत्कृष्ट शिक्षण संस्थेचा बहुमान मिळवलेल्या एका विभागाने विद्यार्थ्यांच्या महाविद...
संदिपकुमार ब्रह्मेचा/नाशिक
: शहरातील केवळ नामवंत नव्हे तर उत्कृष्ट शिक्षण संस्थेचा बहुमान मिळवलेल्या एका विभागाने विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयालयीन पातळीवर परीक्षा घेतल्या मात्र त्याचे गुण दिले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात नामदार गोपाळ कृष्ण गोखले स्कूल ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभाग आहे. २००६साली ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या शुभ हस्ते श्रीगणेशा झालेल्या या विभागाने आजवर नाशिकच्या वृत्तपत्र क्षेत्रात अनेक नामवंत विद्यार्थी घडवण्यात सिहांचा वाटा उचलला पुणे विद्यापीठाच्या एम.जे.एम.सी अभ्यासक्रमाचे धडे दिले जात असलेल्या या विभागाच्या परिक्षा नियमानुसारच परीक्षा घेतल्या जात असल्या तरी सर्व नियम धाब्यावर बसवुन ह्या विभागाने पहिल्या सत्रातील एक विषयाची लेखी परीक्षा घेण्याची परवानगी असतांना विद्यार्थ्यांची पहिल्या सहामाही सत्रांत सर्व विषयांची एकूण १२५ गुण असलेली लेखी परीक्षा घेतली .सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे गुण देत दि.२६/१०/२०१८ रोजी निकाल प्राचार्य व्ही.एन. सुर्यवंशी आणि उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे यांच्या स्वाक्षरीने विभागाच्या नोटीस बोर्डवर निकाल जाहीर करण्यात आला. इथूनच विद्यार्थ्यांच्या खच्चीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पत्रकारितेचे धडे देतांना विभागाने विद्यार्थ्यांचे खच्चीकरणाचे धडेही आपोआपच दिले.
विशेष म्हणजे ह्या सर्व परीक्षा घेतल्या नंतरही अंतिम परीक्षेच्या निकालात मात्र हे गुण ग्राह्य धरले नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयावर कोणत्या प्रकारची कारवाई करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा ह्या अभ्यासक्रमानुसार आणि परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या नियमानुसार, नियोजनानुसार होत असतात. एच.पी.टी महाविद्यालयाचा परीक्षा घेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.महेश काकडेसंचालकपरीक्षा नियंत्रण मंडळ