दानवेंचे दिल्लीतील आंदोलक शेतकर्याबाबत वाचाळ विधान ।संगमनेर/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर संसदेत पारित केलेल्या तीन क...
दानवेंचे दिल्लीतील आंदोलक शेतकर्याबाबत वाचाळ विधान
।संगमनेर/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर संसदेत पारित केलेल्या तीन कृषी कायद्यां विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधवांनी लाक्षणिक आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी बांधव शेतात वर्षभर राबत असतो, न्याय व हक्कासाठी दिल्लीत पोहचलेल्या शेतकर्यांवर लाठीमार करून सरकारने ह्या आंदोलकांचा अवमान केला होताच. परंतू शेतकर्यांच्या आंदोलनामागे चीन व पाकिस्तानचा हात आहे, असे अवमानकारक वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यानी केले आहे. नेहमीच द्वेषपूर्वक विधान करणार्या दानवेंचा निषेध करण्यात आला.
यावेळी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख अमर कतारी, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, माजी तालुका प्रमुख जनार्दन आहेर, युवा जिल्हा समनव्यक भाऊसाहेब हासे, उपशहर प्रमुख पप्पू काणकाटे, इम्तियाज शेख, लखन घोरपडे, युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण युवासेना माजी जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कांदळकर, दीपक साळुंके, प्रथमेश बेल्हेकर, संभव लोढा, ब्रम्हा खिडके, भीमा पावसे, राजाभाऊ सातपुते, फैसल सय्यद, संतोष कुटे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सुरेखाताई गुंजाळ, महिला शहर प्रमुख संगिता ताई गायकवाड, रेणुका ताई, रवी गिरी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.