भाजपच्या गुजरातमधील त्या खासदाराने का दिला राजीनामा ? काय आहे नेमका कारण ? अहमदाबाद : गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या ...
भाजपच्या गुजरातमधील त्या खासदाराने का दिला राजीनामा ? काय आहे नेमका कारण ?
अहमदाबाद :
गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या नेते मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.त्यामुळे भाजपला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे.
खासदार मनसुख वसवा हे गुजरातमधील भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचा दावा वसावा यांनी स्पष्ट केलं आहे. मनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
मी पक्षासोबत निष्ठेने राहिलो आहे. तसे पक्ष आणि जीवनातील सिद्धांताचे पालन करण्यामध्ये खबरदारी बाळगली आहे. मात्र शेवटी मी एक माणूस आहे आणि माणसाकडून चूक होते. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे, असं मनसुख वसावा म्हणालेत.