तालुक्यात फक्त 34 जनावरांवर उपचार सुरू आष्टी । प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून जनावरांना लंम्पी या संसर्गजन्य आजाराने हैराण केले होते. अ...
तालुक्यात फक्त 34 जनावरांवर उपचार सुरू
आष्टी । प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून जनावरांना लंम्पी या संसर्गजन्य आजाराने हैराण केले होते. अनेक जनावरांना या आजाराची लागण झाल्याने विशेषतः दुध उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होत होते. परंतु जनावरांमध्ये होणार्या या आजाराची सध्या तीव्रता कमी झाली असुन तालुक्यात केवळ 34 लंम्पी ग्रस्त जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पशु संवर्धन अधिकारी यांनी दिली आहे.
आष्टी तालुका हा दुध उत्पादनात मराठवाड्यात आघाडीवर आहे. त्यामुळे तालुक्यात दुभत्या जनावरांची संख्या लक्षणीय आहे. सन. 2019 च्या पशु गणणेनुसार तालुक्यात गाय आणि म्हैशींची 1 लाख 26 हजार 952 इतकी संख्या आहे. गेल्या काही महिन्यांपासून लंम्पी या आजाराने जनावरे ग्रस्त होतं आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत 413 जनावरांना लंम्पी या आजाराची लागण झालेली आहे. पैकी सध्या केवळ 34 जनावरे हि ऑक्टीव रूग्ण असुन आज पर्यंत एकाही जनावरांचा मृत्यू या आजाराने झाले नसल्याचे पशुधन विकास अधिकारी यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर तालुक्यात लंम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांची संख्या घटली आहे. तालुक्यात 14 हजार 700 जनावरांना या आजाराची लस देण्यात आल्याची माहिती पशु विकास अधिकारी डॉ. एम. डी. ढेरे यांनी दिली आहे.
---------
लंम्पी आजार हा संसर्गजन्य जन्य आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना या आजाराची लागण होते. या आजाराने नेमके कोणतेही औषध उपलब्ध नाही. केवळ जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून या आजारामुळे होणार्या वेदना कमी करण्यासाठी उपचार केले जातात. हा आजार पहिला शेळ्यामध्ये दिसुन येत होता. शेळ्यांना दिली जाणारी लस हि गाई, म्हैशींना दिली जाते. सध्या तालुक्यात या रोगाने ग्रस्त असलेल्या जनावरांमध्ये घट झाली आहे.
-डॉ.एम.डी. ढेरे, पशुधन विकास अधिकारी, आष्टी
-------------
शेतकर्याचे आर्थिक नुकसान
लंम्पी आजारामुळे जनावरांच्या अंगावर जखमा होतात. त्याच बरोबर दुभत्या जनावरांचे दुध देण्याचे प्रमाण कमी होते अंगावर झालेल्या जखमाचे ओळखाने लवकर जात नाहीत.त्यामुळे या जनावरांची बाजारातील किंमत कमी होते तसेच उपचारावर अधिक खर्च होतो. परिणामी शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते.
------------
आठ हजार जनावरांना दिली लस
आष्टी तालुक्यात लंम्पी आजाराची जनावरांना लागण झाल्यानंतर पशु संवर्धन विभाग विभागाच्या वतीने शेतकर्यांमध्ये जागृती केली. त्याच बरोबर 14 हजार 700 जनावरांना पशु संवर्धन विभागाच्या वतीने या आजाराची लस देण्यात आली आहे.