औरंगाबाद : औरंगाबाद, लातुरमध्ये मोटरसायकल चोरी करणार्या अट्टल चोरट्यांना पकडण्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास यश आले. मंगळवारी (...
औरंगाबाद : औरंगाबाद, लातुरमध्ये मोटरसायकल चोरी करणार्या अट्टल चोरट्यांना पकडण्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास यश आले. मंगळवारी (दि. 29) सायंकाळी मोटरसायकल चोरट्यास ताब्यात घेतले असून आतापर्यंत या प्रकरणात तिघांना विशेष पथकाने अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने एका मोटरसायकल चोरट्यास अटक केली होती. त्याच्याकडून दोन बुलेट व एक पल्सर मोटरसायकल ताब्यात घेतली होती. या प्रकरणाचा विशेष पथकाने अधिक तपास केला त्यावेळी त्यांनी त्याच दिवशी आणखी एक आरोपीस अटक केली होती. मंगळवारी सायंकाळी या दोघांचा तिसरा साथीदार परभणीत आला असल्याची माहिती विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले यांना मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर परिविक्षाधीण पोलिस उपअधीक्षक दडस, फौजदार विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, राहूल चिंचाने, जमीर फारोखी, शंकर गायकवाड़, विष्णु भिसे, अरूण कांबळे यांनी मंगळवारी सायंकाळी एकास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने पॅशन मोटरसायकल चोरल्याचे म्हटले. ती मोटरसायकलही पथकाने ताब्यात घेतली. या मोटर सायकल चोरट्यांनी लातूर औरंगाबाद येथून मोटरसायकल चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन मोटर सायकल लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तर एक औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे आहेत. आतापर्यंत 4 मोटर सायकल दोन बुलेट व एक पॅशन व एक पल्सर मोटर सायकल पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी आरोपी असन्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.