पुर्णा/प्रतिनिधी ः तालुक्यात सप्टेंबर-आक्टोंबर महिण्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमा...
पुर्णा/प्रतिनिधी ः तालुक्यात सप्टेंबर-आक्टोंबर महिण्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकर्यांनी नियमानुसार प्रत्येक पिकांचा पिक विमा भरल्यानंतर ही शेतकर्यांना पिक विमा कंपन्यांनी केवळ यामुळे नुकसान झाल्यानंतर ही पिक विमा मंजूर करून नुकसान भरपाई दिली नाही. की शेतकर्यांनी पिक विमा कंपन्यांना एड्राईड मोबाईलद्वारे ऑनलाईन कळवले नाही. ज्या बोटाबर मोजण्याइतक्या शेतकर्यांनी ऑलाईन मोबाईल द्वारे माहिती दिली त्या शेतकर्यांनाच विम्याची रक्कम देण्यात आली. परंतु असंख्य शेतकर्यांकडे अड्राईड मोबाईल नसल्याने व तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने या एकमेव शुल्लक कारणावरून रिलायंन्स विमा कंपनीने असंख्य शेतकर्यांवर अन्याय करीत त्यांची फसवणूक केल्याचे उघड होत असून शेतकर्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तालुक्यातील शेतकर्यांनी परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे रिलायंन्स विमा कंपनीविरोधात लेखी स्वरूपात रितसर तक्रार देऊन तक्रारीची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली असून तक्रार अर्जाची दखल न घेतल्यास शेतकर्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या तक्रार अर्जावर गुनाजी सदाशिव मोहिते, केशव भुजंगराव मोहिते, सुधाकर संतोबा मोहिते, गोपाल वामनराव मोहिते, मदन सोपान मोहिते, विठ्ठल सिद्राम मोहिते, बालाजी गंगाधर मोहिते, सिद्धाम नाना मोहिते, नवनाथ नागोराव चवरे, पवन भगवान मोहिते, मारोती बापूराव आदींच्या स्वाक्षरी आहेत.