अकोले /प्रतिनिधी शेतकऱ्यानं विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप-चे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला अकोल्यात जोडे मारत त्यांचा नि...
अकोले /प्रतिनिधी
शेतकऱ्यानं विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप-चे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला अकोल्यात जोडे मारत त्यांचा निषेध नोंदविला पंजाब व हरियाणा येथील शेतकरी दिल्ली दरबारी आंदोलन करत असताना या आंदोलनाची दखल घेण्यापेक्षा उलट या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचे काम भाजपाचे काही लोक करत आहेत. यावेळी दिल्ली येथील या आंदोलनास पाकिस्तानचा हात आहे व शेतकरी बांगलादेशी असल्याचा अजब दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याने संपूर्ण देशात दानवेंवर टिका होत आहे. याचाच एक भाग म्हणून काळ अकोले येथे ही शिवसेना पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, मिलिंद रुपवते, प्रदीप हासे, नितीन नाईकवाडी, अतुल लोहटे, माधवराव तिटमे, भाऊसाहेब गोर्डे, शारदाताई शिंगाडे, महेश हासे, प्रमोद मंडलिक, गणेश कानवडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.