कल्याण : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमूळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंगळवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर...
कल्याण : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमूळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंगळवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याणात पोलिसांकडून स्टेशन परिसरासह शहरातील चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली होती. पोलिसांकडून कल्याण स्टेशन परिसरात मास्क न घालणाऱ्या, विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर बैलबाजार परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान मास्क न घालता गाडी चालवणाऱ्या चालकांवरही यावेळी कायदेशीर कारवाई करण्यात आली. पुढील 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी आदेश असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन एसीपी अनिल पोवार यांनी केले. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.