माजलगाव। प्रतिनिधीः- तालुक्यातील हिवरा (बु.) येथे दलित वस्तीवर गावातीलच गाव गुंडांनी हल्ला करत त्याला बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्...
माजलगाव। प्रतिनिधीः-
तालुक्यातील हिवरा (बु.) येथे दलित वस्तीवर गावातीलच गाव गुंडांनी हल्ला करत त्याला बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी केली आहे. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात दलितांवरील अन्याय आणि अत्याचार वाढत चालले आहेत. मागील एक ते दोन महिण्यामध्ये घोडा कवडगाव येथील तरूणास जिवे मारण्याचे प्रकरण, पारध्यांचे तिहेरी हत्याकांड, सांडस चिंचोली येथील घटना, वडवणी येथील घटना असेल या व अशा अनेक घटना जिल्ह्यात घडत आहेत. जिल्हा पोलिस प्रशासन पुर्णतः कोलमडून गेल्याचे या घटनेतुन दिसत आहे. या सर्व घटनांचा परिपाक आज पुन्हा हिवरा (बु.) (ता.माजलगाव) येथे झालेला दिसत आहे. हिवरा बु. येथील दलित वस्तीवर गावातीलच गाव गुंडांनी हल्ला करत महिला व मुलांवर दगडफेक, कु-हाड, लाठी काठीने मारहाण करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गावातील दलित भयभयीत झाले असुन या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी केली आहे.