पाचवड / वार्ताहर : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी भुईंज पोलिसांत पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. धीरज मारुती ओंबळे (वय 4...
पाचवड / वार्ताहर : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी भुईंज पोलिसांत पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. धीरज मारुती ओंबळे (वय 40, रा. भुईंज, ता. वाई) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, सपोनि आशिष कांबळे, निरीक्षक मोरे, हवालदार आनंदा भोसले, हवालदार विकास गंगावणे करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुईंज येथे मोलमजुरी करणार्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगी एका खासगी दवाखान्यात काम करते. 15 डिसेंबर रोजी ती घरी न आल्याने तिच्या पालकांनी शोधण्यासाठी प्रयत्न केला. परंतू ती मिळून न आल्याने तिच्या पालकांनी भुईंज पोलिसांत तक्रार दिली होती. यावर सपोनि आशिष कांबळे यांनी एक तपास पथक तयार करून मुलीला शोधण्यासाठी रवाना केले.
या पथकातील कर्मचार्यांनी अल्पवयीन मुलीस फूस लावून, तसेच आमिष दाखवून अत्याचार करणार्या संशयित धीरज मारुती ओंबळे यास ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी संशयितावर पोक्सो, बलात्कार व ऍट्रॉसिटी अशी कलमे लावून अटक केली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, सपोनि आशिष कांबळे, निरीक्षक मोरे, हवालदार आनंदा भोसले, हवालदार विकास गंगावणे करत आहेत.