$type=ticker$snippet=hide$cate=0

अग्रलेख : गतीमान तंत्रज्ञानाकडे

   तंत्रज्ञानातील पहिल्या पिढीला तयार व्हायला वेळ लागतो; परंतु नंतरच्या पिढीतील अंतर कमी कमी होत जाते, हा गेल्या दोन दशकांचा अनुभव आहे. पहिल...

  


तंत्रज्ञानातील पहिल्या पिढीला तयार व्हायला वेळ लागतो; परंतु नंतरच्या पिढीतील अंतर कमी कमी होत जाते, हा गेल्या दोन दशकांचा अनुभव आहे. पहिली पिढीतून दुसर्‍या पिढीत जायला एक दशक लागले. त्यानंतरच्या चार पिढ्यांचा प्रवास अवघ्या एका दशकात झाला. जगात आता काही ठिकाणी एच जी (आठवी पिढी) चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी चाचण्याही सुरू झाल्या आहेत. भारतात मात्र अजूनही मोबाईल तसेच अन्य तंत्रज्ञनाबाबत फोर जी तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यातही काही लोकांकडे तर अजून टू जी, थ्री जी चेच मोबाईल आहेत. रिलायन्सने भारतात ही जनरेशन बदलण्यात मोठी भूमिका घेतली असली, तरी सरकारचा त्याला प्रतिसाद देण्याचा वेग तितका नाही. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी फाईव्ह जी तंत्रज्ञान आणण्याची घोषणा केली असली, तरी गेल्या तीन वर्षांपासून त्यावर केवळ चर्चाच होत होती; परंतु आता हे तंत्रज्ञान भारतात प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी अंबानी यांनी पुन्हा फाईव्ह जी तंत्रज्ञान भारतात कधी येणार, हे सांगितले. विशेष म्हणजे फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी आता चीनच्या हुवाए कंपनीवर अवंलबून राहण्याची गरज नाही. त्याचे कारण आता फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांची उपकरणे आता नोकिया कंपनी भारतात बनवीत असून सध्या त्याची निर्यातही सुरू आहे. भारतात फाईव्ह जी सेवा सुरू झाली नसली, तरी असे मोबाईल भारतीय बाजारपेठेत मोठया संख्येने खपत आहेत. वन प्लस, मोटोरोला, शिओमी, व्हिओ आदी कंपन्यांचे मोबाईल भारतात दाखल झाले आहेत. कोणाचा स्मार्टफोन किती स्वस्त, त्यामध्ये प्रोसेसर कोणता आदी चर्चा होत असतानाच देशात फाईव्ह जी नेटवर्क कधी सुरू होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर अंबानी यांनी मोबाईलकाँग्रेसमध्ये  बोलताना आणखी सहा महिन्यांत भारतात फाईव्ह जी नेटवर्क सुरू होईल, याची घोषणा केली. गेल्या वर्षी अंबानी यांनी भारतातील टू जी व थ्रीजी तंत्रज्ञान वापरणार्‍यांनी फोर जी तंत्रज्ञानाचे मोबाईल स्वस्तात उपलब्ध करून दिले. भारतातील लोक तंत्रस्नेही आहेत; परंतु दुसर्‍या, तिसर्‍या पिढीचे तंत्रज्ञान वापरणार्‍यांना थेट पाचव्या पिढीत नेणे तेवढे सोपे नाही. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या फाईव्ह जी मोबाईलच्या किंमती सरासरी वीस हजारांच्या पुढे असून सामान्यांपर्यंत हे तंत्रज्ञान झिरपवायचे असेल, तर त्यांना कमी किंमतीत फाईव्ह जी तंत्रज्ञानातील मोबाईल उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यादृष्टीने अंबानी यांची नक्कीच योजना असावी. नोकिया व अन्य कंपन्यांशी केलेली भागीदारी त्यादृष्टीने महत्त्वाची आहे.

भारतात रिलायन्स जिओ फाईव्ह जी सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरज अंबानी यांनी व्यक्त केली. जोपर्यंत सोपे धोरणात्मक बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग व स्वस्त मोबाईल बनविले जाणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाही याची त्यांना जाण आहे. 2021 मध्ये जिओ भारतात ’फाईव्ह जी ’ ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल. याशिवाय हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीदेखील स्वदेशीच असणार आहे. जिओच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहोत, असे अंबानी यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपूर्वीच जिओ ला फाईव्ह जी तंत्रज्ञानात यश आले होते. खासगी कंपन्या जेवढ्या गतीने फाईव्ह जी तंत्रज्ञान आणायला उत्सुक आहेत, तेवढी उत्सुकता आता सरकारला दाखवावी लागेल. त्यासाठी दूरसंचार लहरीचे क्षेत्र विकण्याचा निर्णय तातडीने घ्यावा लागेल. जिओ ही ’फाईव्ह जी ’ क्रांतीची लीडर ठरणार आहे. येत्या काही दिवसांत भारत सेमी कंक्टर उत्पादनाचा हब होण्याची शक्यता आहे. त्याचे उत्पादनही रिलायन्सने करण्याचा निर्णय घेतला असावा. सेमी कंडक्टरच्या आयातीच्या भरवश्यावर आम्ही राहू शकत नाही, हे त्यांचे म्हणणे पुरेसे सूचक आहे. देशात सध्या 30 कोटी टू जी मोबाईल वापरणारे आहेत. त्यांच्यापर्यंत स्मार्टफोन पोहोचण्याची गरज आहे. यासाठी नीतिगत हस्तक्षेपाची गरज आहे, गेल्या दोन वर्षांपासून अंबानी हेच सांगत आहेत. आपण

डिजिटली खूप चांगल्याप्रकारे जोडले गेलो आहोत, तरीही ते पुढच्या पिढीत अजून आलेले नाहीत. ‘फाइव्ह जी’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत. 31 जुलै 1995 रोजी मोबाइलचे तंत्रज्ञान भारतात दाखल झाले. तेव्हा एका मिनिटाच्या कॉलसाठी 16.80 रुपये मोजावे लागत होते. आता व्हॉइस कॉल जवळपास विनामूल्य झाले आहेत. चीनपाठोपाठ सर्वाधिक मोबाइल ग्राहक भारतात आहेत. या लक्षणीय प्रवासाला आज 25 वर्षे पूर्ण होत असून यापुढील दूरसंचार क्षेत्रातील वाटचाल अधिक आश्‍चर्यकारक असेल. ‘टू जी’मध्ये फक्त संभाषण शक्य होते. ‘थ्री जी’मध्ये डेटा दाखल झाला; मात्र त्याचा वेग अत्यंत कमी होता. ‘फोर जी’ दाखल झाल्यानंतर केवळ वेगच वाढला नाही, तर आपले संभाषणही डेटाच्या माध्यमातून सुरू झाले; परंतु हे तंत्रज्ञान फोन, टॅब आदींपर्यंतच मर्यादित होते. ‘फाइव्ह जी’मध्ये इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड 10 पटीने वाढणार असून मशिन टू मशिन संपर्क यंत्रणा स्थापन करणे शक्य होणार आहे. त्या परिस्थितीत असंख्य कामांसाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरजच शिल्लक राहणार नाही. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चे हे युग असेल. दैनंदिन जीवनातले अनेक घटक या यंत्रणेच्या माध्यमातून जोडले जाणे शक्य होईल. त्यानंतर येणार्‍या ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजीमुळे आपण डिजिटल वर्ल्डमध्ये प्रवेश करू, असे करंदीकर यांनी सांगितले. इंटरनेट दाखल झाल्यानंतर कोणत्या नावीन्यपूर्ण गोष्टी (इनोव्हेशन) येतील याची कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे फाईव्ह आणि सिक्स जी तंत्रज्ञान कोणकोणत्या नव्या संकल्पना आणि बदलांना जन्म देते हे येणारा काळच ठरवेल. नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील

1989 साली संगणक दाखल झाल्यानंतर लाखो नोकर्‍या जातील, अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र ती निरर्थक ठरली. त्याच धर्तीवर ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील, ही भीती बाळगण्याचे कारण नाही; मात्र तो धोका टाळायचा असेल, तर बदलत्या परिस्थितीनुसार नवनवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील. तंत्रज्ञानाच्या या अनिर्बंध शिरकावामुळे वैयक्तिक पातळीवर सायबर सुरक्षेचे अनेक मुद्दे उपस्थित होतील. ते अपरिहार्य आहेत; मात्र नवे तंत्रज्ञान विकसित करताना रिस्क मॅनेजमेंटवर निश्‍चितच भर दिला जाईल. तसेच, वैयक्तिक पातळीवरही सुरक्षेबाबत प्रत्येकालाच अधिक सजग व्हावे लागणार आहे. भारतात 2021 मध्ये फाईव्ह जी सेवा लॉन्च होणार असल्याचा दावा दूरसंचार कंपनी एरिक्सनने केला आहे. 

प्रमुख दूरसंचार कंपनी एरिक्सनच्या एका रिपोर्टनुसार, जगभरात 2026 पर्यंत 3.5 अब्ज फाईव्ह जी कनेक्शन असतील, तर भारतात 5जी कनेक्शनची संख्या ही जवळपास 35 कोटी इतकी असेल. स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षाच्या सुरुवातीला झाला, तर भारताला त्याचे पहिले फाईव्ह जी कनेक्शन 2021 मध्येच मिळू शकते. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट - 2020 नंतर जगभरात एक अब्ज लोक असे असतील, जे जागतिक लोकसंख्येचा 15 टक्के हिस्सा असून त्यांची फाईव्ह जी कव्हरेजपर्यंत पोहोच असेल.


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15277,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12359,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अग्रलेख : गतीमान तंत्रज्ञानाकडे
अग्रलेख : गतीमान तंत्रज्ञानाकडे
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_990.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_990.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content