अकोले/प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना व मी भाजप प्रवेश केला. त्यावेळी जी कामे मंजूर झाली होती. तेच कामे तालुक्यात सुरू आहे न...
अकोले/प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना व मी भाजप प्रवेश केला. त्यावेळी जी कामे मंजूर झाली होती. तेच कामे तालुक्यात सुरू आहे नवीन कोणतेही कामे नाही, निधी नाही कोरोनाचा संकट अजूनही संपले नाही, कोव्हिड काळात तालुक्यतील जनतेला पुरेशा सुविधा मिळाल्या नाही. अतिवृष्टीची तुटपुंजी मदत मिळाली, खावटी साठी जाचक अटी टाकल्या आहे, तालुक्यात रोजगार हमीचे कामे सुरू नाही एकूणच सरकार व तालुक्याचे विद्यमान आमदारांचे याकडे दुर्लक्ष आहे. आमदार व सरकार करतंय काय असे सांगत आमदाराना त्यांच्या कामासाठी आमच्या शुभेच्या आहे. अशी उपरोधिक टीका माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.
आज शुक्रवारी भाजप पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या कामाला माझ्या शुभेच्छा आहे असे सांगत असताना पिचड म्हणाले की कोव्हिड काळात अगस्ती कारखान्याने सामाजिक भावनेतून कोव्हिड सेंटर सुरू केले मात्र त्याला आवश्यक साहित्य व औषधें देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. तालुक्यात खानापूर भांडकोळी हॉस्पिटल येथे जे कोव्हिड चे काम सुरू आहे. त्यासाठी पुरेशा सुविधा देता आल्या नाही तालुक्यात आज रोजगारची मागणी आहे पण रोजगार हमीचे कामे सुरू नाही. यापूर्वी कधीच आदिवासींसाठी खावटी कर्जाला किचकट अटी लावल्या नाही परंतु आता किचकट अटी टाकल्या आहे. यामुळे अनेक जण खावटी पासून वंचीत राहणार आहे. चुकीच्या निकषांमुळे खावटीचा योजनेचा लाभ आदिवासींना मिळणार नाही. ज्या विकास कामाचे तुम्ही उदघाटन करतात ते कामे माझ्या काळातील आहे मंजुरी आदेश दाखवून तुमच्या कामांचा लेखा जोखा मांडा असे यावेळी ते म्हणाले आम्हाला सोडून जाणारे त्यांना त्यांचा संसार करू द्या असं सांगितलं
अकोले भाजपा पदाधिकारी निवडी मध्ये आम्हाला अडचणीच्या काळात साथ देणाऱ्यांना व पक्ष्याचे काम करणार्यांना भाजपा तालुका विविध कामिटयामध्ये स्थान दिले आहे. सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून भाजप काम करत आहे. यासाठीच गॅस व मोफत धान्य या सारख्या योजना केंद्र सरकारने राबविल्याचे आहे. अकोले नगरपंचायतींने चांगली व सकारात्मक कामे केली आहे. कोव्हिड मध्ये ही चांगले काम नगरपंचायतीने केले आगामी नगरपंचायत निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीत मित्र पक्ष बरोबर आल्यास त्यांना बरोबर घेऊन लढू मात्र तसा अद्याप कोणाचा प्रस्ताव आला नसल्याचे ते म्हणाले यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते गिरजा जाधव, जिल्हा परिषद गट नेते जालिंदर वाकचौरे, भाजपा तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे उपस्थित होते. भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी अकोले भाजपा पक्षाची तालुका कार्यकारणी, तसेच भाजपा युवा मोर्चा महिला आघाडी, किसान आघाडी, ओबीसी सेल, दिव्यांग सेल, दलित अल्पसंख्यांक सेल, कामगार सेल अशा भाजप प्रणित आघाड्यांच्या पदाधिकारी निवडी जाहीर केल्या.