फलटण /प्रतिनिधी : फलटण शहर पोलीस स्टेशन येथील बहुउद्देशीय हॉल व कोविड केअर सेंटरचे उद्घाटन के. बी. एक्सपोर्टचे मॅनेजर सचिन यादव यांचे हस्त...
फलटण /प्रतिनिधी : फलटण शहर पोलीस स्टेशन येथील बहुउद्देशीय हॉल व कोविड केअर सेंटरचे उद्घाटन के. बी. एक्सपोर्टचे मॅनेजर सचिन यादव यांचे हस्ते करण्यात आले.
के केअर सेंटर उभारण्यासाठी के. बी. एक्सपोर्ट कंपनीच्या सहकार्यातून 12 बेड, फ्लोअरींग, ऑक्सीजन लाईन तसेच इलेक्ट्रिक इत्यादी कामे करुन नुतनीकरण केले आहे. तसेच फलटणमधील सामाजिक संस्था सगुणा माता कन्स्ट्रक्शन, लॉयन्स क्लब यांचे लोकवर्गणीतून तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांचे वर्गणीतून टॉयलेट युनिट व सुशोभीकरण करण्यात आले आहे. केअर सेंटर हे सातारा जिल्ह्यातील पोलीस दलामार्फत उभारलेले दुसरे केअर सेंटर आहे. केअर सेंटर उभारणीसाठी फलटण शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व आधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या हॉलचा उपयोग भविष्यकाळात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचारी व तपासासाठी बाहेरुन आलेल्या पोलीस कर्मचार्यांना राहण्यासाठी होईल. उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण शहरचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, के. बी. एक्सपोर्टचे हेमंत खलाटे व पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच फलटण मधील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.