$type=ticker$snippet=hide$cate=0

मित्राच्या पाठीत खंजीर

    मित्र म्हणायचं आणि मित्राचं खच्चीकरण करायचं, ही मित्रत्वाची नवी व्याख्या भाजपनं तयार केली आहे. प्रादेशिक पक्षाची मदत घेऊन त्याच्या मदतीन...

  


 मित्र म्हणायचं आणि मित्राचं खच्चीकरण करायचं, ही मित्रत्वाची नवी व्याख्या भाजपनं तयार केली आहे. प्रादेशिक पक्षाची मदत घेऊन त्याच्या मदतीनं संबंधित राज्यात हातपाय पसरायचे आणि नंतर त्या मित्रालाच हातपाय पसरायला जागा ठेवायची नाही, अशी भाजपची रणनीती असते. मित्राचा धरलेला हात कधी त्याच्या गळ्यात अडकवला जाईल, याचा भरवसा देता येत नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक पक्षांनी तो अनुभव घेतला आहे. नितीशकुमार यांना सध्या तोच अनुभव येतो आहे.

अरबी उंटाची एक सुरस कथा सांगितली जाते. हा उंट एकदा की दुसर्‍याच्या तंबूत शिरला, की तो तंबूच बळकावून बसतो. भाजपचं तसंच आहे. तो एखाद्या मित्राच्या तंबूत शिरतो आणि त्या मित्रालाच तंबूतून बाहेर काढतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक सहकारी पक्षांनी तो अनुभव घेतला आहे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, या मराठी म्हणीचा अनुभव सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना येत असेल. हा अनुभव पूर्वी शिवसेना, तेलुगु देसम, पीडीपी, बिजू जनता दल, अकाली दल, धर्मनिरपेक्ष जनता दल, बहुजन समाज पक्ष आदींनी घेतला आहे. त्यातील बिजू जनता दल फक्त भाजपला पुरून उरला. शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. नितीशकुमार यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं; परंतु नंतर त्यांनी जुळवून घेतलं आणि त्यात संयुक्त जनता दलाचं किती नुकसान झालं, हे सर्वांनी  पाहिलं आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाशी युती तर केली; परंतु त्याच वेळी संयुक्त जनता दलाला छोटा भाऊ करण्याची व्यूहनीती आखली. लोक जनशक्ती पक्षाला नितीशकुमार यांच्या विरोधात निवडणूक लढवायला भाग पाडून संयुक्त जनता दलाच्या जागा कमी करण्याच्या व्यूहरचनेला यश आलं. संयुक्त जनता दलाच्या जागांची संख्या 40 वर आणून ठेवल्या. नितीशकुमार यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या, तरी त्यांनाच मुख्यमंत्री करू, असा दिलेला शब्द जरी भाजपनं पाळला असला, तरी त्यामागंही वेगळी व्यूहनीती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची जशी फसवणूक केली, तशी बिहारमध्ये केली असती, तर भाजपच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न उपस्थित झाला असता. शिवाय भाजपकडं मुख्यमंत्रिपदासाठी चांगला चेहरा नव्हता. सुशीलकुमार मोदी हे भाजपपेक्षा नितीशकुमार यांचे जास्त निकटचे मित्र होते. त्यामुळं त्यांना केंद्रात नेऊन नितीशकुमार यांचे पंख छाटण्याचा काम भाजपनं केले. त्यांचं ज्या पद्धतीनं खच्चीकरण करायला सुरुवात केली, ते पाहता नितीशकुमार यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखी आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता पक्षाला अत्यंत कमी जागा मिळाल्यानं त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. ती त्यांनी निवडणुकीनंतर बोलून दाखविली होती; परंतु त्यानंतर त्यांनी ती स्वीकारली असली, तरी ते दुखावले होते. संयुक्त जनता दलाच्या मंत्र्यांविरोधात तक्रारी करण्यातही भाजपच आघाडीवर होता. त्यामुळं काही मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची वेळ संयुक्त जनता दलावर आली. त्या दुःखातून सावरत नाहीत, तोच भाजपनं अरुणाचल प्रदेशातील संयुक्त जनता दलाचे सहा आमदार फोडले. ज्या दिवशी ही घटना घडली, त्याचदिवशी नितीशकुमार यांची देहबोली त्यांची भाजपविषयीची नाराजी दाखवत होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेणार्‍या नितीशकुमार यांनी रविवारी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती; मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळं मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा नितीशकुमार यांनी केला. कोणालाही मुख्यमंत्री बनवा. कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं, तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाही, अशा शब्दांमध्ये नितीशकुमार यांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी भाजपविरोधात आहे, हे उघड आहे.


बिहारमधील निवडणुकीनंतर जेव्हा नितीशकुमार यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली, तेव्हाच तारिक अन्वर या काँग्रेसच्या नेत्यानं नितीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून काम करणं अवघड होईल, असं सूतोवाच केलं होतं, ते अवघ्या एका महिन्यात खरं ठरलं. सुशीलकुमार मोदी यांना दिल्लीला नेताना नितीशकुमार यांची कोंडी करण्यासाठी दोन उपमुख्यमंत्रिपदं तयार केली गेली. त्यामुळं तर नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दलाच्या पाटण्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसताना दबाव आणून मला ते घ्यायला भाग पाडलं, असं जे म्हटलं, त्याला दोन दिवसांतील भाजपचं वर्तनही कारणीभूत आहे. पक्षाच्या पराभवानं खचलेल्या नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले. नितीशकुमार यांनी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडं सोपवलं आहे. 2016 मध्ये शरद यादव यांनी पक्ष सोडल्यापासून नितीशकुमार यांच्याकडंच राष्ट्रीय अध्यक्षपद होतं. रामचंद्र प्रसाद सिंह हे राज्यसभेत संयुक्त जनता दलाचे संसदीय पक्षनेते आहेत. एकप्रकारे नितीशकुमार यांनी आरसीपी सिंह यांना आपला राजकीय उत्तराधिकारीच बनवलंआहे. आरसीपी सिंह हे नितीशकुमार यांच्या विश्‍वासातील आहेत. सिंह यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय नितीशकुमार कोणताही महत्वाचा निर्णय घेत नाहीत.

राजकारणात येण्या अगोदर ते प्रशासकीय सेवेत होते. ते उत्तर प्रदेश केडरमधून आयएएस होते. रामपूर, बाराबंकी, हमीरपूर आणि फतेहपूर येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. आरसीपी सिंह राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याअगोदर पक्षात दुसर्‍या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जात. निवडणूक रणनीती निश्‍चित करणं, राज्यातील अधिकारशाहीवर नियंत्रण ठेवणं, सरकारसाठी धोरण ठरवणं व त्यांची अंमलबजावणी करणं, यांसारख्या कामांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यामुळंच त्यांना संयुक्त जनता दलाचं चाणक्य म्हटलं जातं.

भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय लोकशाहीमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला मोठा झटका दिला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपनं अरुणाचल प्रदेशमध्ये नितीशकुमार यांच्या सहा आमदारांना फोडलं आहे. अरुणाचलमध्ये संयुक्त जनता दलाचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपमध्ये  प्रवेश केला आहे. याशिवाय, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) चे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनीदेखील भाजपत प्रवेश केला आहे. रमगोंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, ताली येथील जिकके ताको, कलाक्तंगचे दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिला येथील डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघातील कांगगोंग टाकू यांनी भाजपत प्रवेश केला आहे. संयुक्त जनता दलानं 26 नोव्हेंबर रोजी सियनग्जू, खर्मा आणि टाकू यांना पक्ष विरोधी कार्यावाही केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती व त्यांना निलंबितदेखील केलं होतं. आता त्यांच्या हाती कमळ आल्यानं संयुक्त जनता दलाच्या दुखर्‍या जखमेवर भाजपनं मीठ चोळलं आहे. खरंतर अरुणाचल प्रदेशात भाजपची सत्ता होती. तिथं बहुमत असतानाही त्याला आमदार फोडण्याची गरज नव्हती; परंतु शत प्रतिशत भाजप करताना इतर पक्ष मग त्यात मित्रपक्षही नसावेत, असं त्याचं धोरण आहे. अरुणाचल प्रदेशात संयुक्त जनता दल हाच प्रमुख विरोधी पक्ष होता. त्याचे सात आमदार होते. असं असताना विरोधी पक्ष संपविण्याची खेळी भाजपनं खेळली. हीच खेळी गोव्यात महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष आणि काँग्रेसबाबत केली. कर्नाटकात काँग्रेस, धर्मनिरपक्ष जनता दल, गुजरात, मध्य प्रदेशात काँग्रेसचे आमदार फोडून केली. अरुणाचल प्रदेशातील घटनेवर संयुक्त जनता दलानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते अनुचित व मैत्रीपूर्ण नसल्याचं म्हटलं; परंतु त्याची दखल घ्यावी असं भाजपला वाटलं नाही. त्यातूनच त्याचं निर्ढावेलपण दिसतं. बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दल आघाडीचं सरकार आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि विकसनशील इंसान पार्टीदेखील युतीमध्ये आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या या वृत्तीची चर्चा आहे. अरुणाचल प्रदेशमधील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलानं 15 जागा लढवल्या, त्यातील सात जागा जिंकल्या. भाजपने 41 जागा जिंकल्या. भाजपनंतर अरुणाचलमधील संयुक्त जनता दल हा सर्वांत मोठा पक्ष होता. 60 सदस्यांच्या विधानसभेत आता भाजपकडं 48 सदस्य आहेत, तर संयुक्त जनता दलाकडं आता एकच सदस्य उरला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी ‘बिगर मित्र’ म्हणून संबोधत आक्षेप नोंदविला आहे. तथापि, बिहारमधील संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्यातील संबंधांवर या विकासाचा कोणताही परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं; परंतु नितीशकुमार याची नाराजी पुरेशी दखल घेण्यासारखी आहे.

 

Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5763,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,197,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,38,satara,141,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10331,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,705,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16432,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13671,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1550,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मित्राच्या पाठीत खंजीर
मित्राच्या पाठीत खंजीर
https://lh3.googleusercontent.com/-IvyLadGIM2I/X-n3c1rgVRI/AAAAAAABmJE/seVVnfZvpncGElLxP5kB1G2ksGaPG8XqwCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-IvyLadGIM2I/X-n3c1rgVRI/AAAAAAABmJE/seVVnfZvpncGElLxP5kB1G2ksGaPG8XqwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_996.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_996.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content