मुंबई : पीपीएफ भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून केलेली बचत ही छोट्या स्वरुपातील बचत आहे. पीपएफमार्फत केलेली बचत अगदी सुरक्षित आणि करमुक्त...
मुंबई : पीपीएफ भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून केलेली बचत ही छोट्या स्वरुपातील बचत आहे. पीपएफमार्फत केलेली बचत अगदी सुरक्षित आणि करमुक्त असते. त्यामुळे या माध्यमातून बचत करण्याकडे अनेकांचा ओढा असतो. पीपीएफमध्ये प्रती महिना, प्रत्येक तीन महिन्यांनी किंवा वर्षाच्या मुदतीने गुंतवणूक करता येते. मात्र, तुम्ही पीपीएफमध्ये प्रतिमहा गुंतवणूक करत असाल तर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेआधीच खात्यात रक्कम जमा करावी. कारण त्यामुळे तुम्हाला जास्त लाभ होईल.
5 तारखेच्या आधी पैसे का जमा करावेत
पीपीएफमध्ये प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आधी रक्कम जमा केली, तर त्याचा फायदा जास्त होतो. कारण 5 तारखेआधी खात्यात रक्कम जमा केल्यास खात्यात आधीच शिल्लक असलेली आणि 5 तारखेपर्यंत भरण्यात आलेली रक्कम अशा दोन्ही रकमेवर व्याज मिळते. हे व्याज वर्षाच्या शेवटी पीपीएफ खात्यात जमा केली जाते.
वर्षातून एकदात रक्कम जमा करत असाल तर
जर तुम्ही पीपीएफ खात्यात वर्षातून एकदाच पूर्ण रक्कम जमा करत असाल तरीसुद्धा 5 तारखेआधीच रक्कम जमा करा. कारण जमा केलेल्या रकमेवर पूर्ण व्याज मिळवायचे असेल तर वर्षातून एकदा जमा करत असलेला निधी 5 एप्रीलच्या आधीच जमा करवा. त्यामुळे तुम्हाला फायदा मिळू शकेल.
जास्तीत जास्त किती गुंतवणूक करावी
सध्याच्या नियमानुसार पीपीएफमधील गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने चक्रव्याढ व्याज मिळत आहे. वर्षाला 500 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत पीपीएफ खात्यामध्ये बचत करता येऊ शकते.