$type=ticker$snippet=hide$cate=0

टीम इंडियाचे अनुभवी फंलदाज अपयशी ठरले, तिथे नवशिक्या पृथ्वी शॉकडून (Prithvi Shaw) काय अपेक्षा ठेवणार.

  अ‌ॅडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडि...

 


अ‌ॅडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाला दुसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. ज्याला टेस्ट स्पेशालिस्ट म्हटलं जातं तो चेतेश्वर पुजाराही शून्यावर बाद झाला. जिथे टीम इंडियाचे अनुभवी फंलदाज अपयशी ठरले, तिथे नवशिक्या पृथ्वी शॉकडून काय अपेक्षा ठेवणार. पहिल्या सामन्यात संपूर्ण संघ अपयशी ठरला. मात्र तरीही पृथ्वी शॉवर टीका करण्यात येत आहे. पृथ्वीने या सामन्यात पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावात 4 धावा केल्या. 

पृथ्वीला आयपीएलच्या 13 व्या मोसमातही फार चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यात पहिल्या कसोटीतही पृथ्वी अपयशी ठरला. यामुळे पृथ्वीवर काही क्रिकेटपटूंनी टीका केली. नेटीझन्सनी तर पृथ्वीला इतकं ट्रोल केलं की तो ट्विटरवर ट्रेंड झाला. पण पृथ्वी खरचं इतका वाईट खेळला का? हे आपण इतर क्रिकेटपटूंसोबतच्या आकडेवारीशी तुलना करुन जाणून घेऊयात.

टीम इंडियातील चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली हे खेळाडू अनुभवी आहेत. यांना कसोटीमध्ये फारसा अनुभव आहे. मात्र या आणि इतर खेळाडूंची कसोटीतील सुरुवात फारशी चांगली किंवा उल्लेखनीय नव्हती. हे खेळाडूंचीही सुरुवात अडखळत झाली होती. यानिमित्ताने आपण टीम इंडियाच्या आणि काही दिग्गज फलंदाजांची पहिल्या सामन्यातील आकडेवारी पाहुयात.

पहिल्या कसोटीतील डावनिहाय धावा

.सचिन तेंडुलकर- 15.

. विराट कोहली- 74 आणि 4

.चेतेश्वर पुजारा- 43 आणि 0

.अजिंक्य रहाणे- 42 आणि 0


परदेशी खेळाडूंची पहिल्या कसोटीतील धावा

ब्रायन लारा- 44

रिकी पॉन्टिंग-96

जॅक कॅलीस- 1


वर ज्या खेळाडूंची आकडेवारी देण्यात आली आहे, ते क्रिकेटमधील दिग्गज तसेच अनुभवी खेळाडू आहेत. मात्र यांचीही सुरुवात फारशी चांगली राहिली नाहीये. मात्र या सर्वांच्या तुलनेत पृथ्वी हा उजवा ठरला आहे. पृथ्वीने आपल्या कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं आहे. तसेच त्याने आतापर्यंत केवळ 5 कसोटी सामनेच खेळले आहेत. पृथ्वी युवा खेळाडू आहे. त्याला फार अनुभव नाही. तो आपल्या चुकांमधून शिकेल. त्याला आणखी वेळ द्यायला हवा, अशी प्रतिक्रियाही क्रिकेट चाहत्यांकडून देण्यात येत आहे.


पृथ्वीने आतापर्यंत एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 9 डावात 339 धावा केल्या आहेत. यात एका शतकी खेळीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पृथ्वीने आपल्या पदार्पणातील सामन्यात शतक झळकावलं.


पृथ्वीबाबत आकाश चोप्राची प्रतिक्रिया

“पहिल्या कसोटीत केवळ पृथ्वीच नाही तर टीम इंडियाचे खेळाडू धावा करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने दिली. तसेच दुसऱ्या सामन्यात पृथ्वीला संधी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात आहे. याबाबतही आकाश चोप्राने आपलं मत व्यक्त केलं आहे. ” पृथ्वीला दुसऱ्या सामन्यातून बाहेर ठेवल्यास तो एकटा बळीचा बकरा ठरेल”, अशी प्रतिक्रिया चोप्राने दिली.


भारतीय खेळाडू अयशस्वी का ठरले?

पहिला कसोटी सामना पिंक (गुलाबी) चेंडूने खेळण्यात आला. ऑस्ट्रेलियात गुलाबी चेंडूने खेळण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ होती. या चेंडूने कशाप्रकारे खेळायचं, याबाबत टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला अनुभव नव्हता. हा गुलाबी चेंडू हवेत कसा स्विंग होतो, उसळी घेतो का, तसेच खेळपट्टीकडून काही मदत मिळते का, या आणि अशा कोणत्याच प्रकारची माहिती किंवा अनुभव टीम इंडियाच्या खेळाडूंना नव्हता. त्यामुळे दुसऱ्या डावात आघाडी असून सुद्धा टीम इंडियाचा दुसरा डाव कोसळला.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4199,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15556,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12668,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3490,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: टीम इंडियाचे अनुभवी फंलदाज अपयशी ठरले, तिथे नवशिक्या पृथ्वी शॉकडून (Prithvi Shaw) काय अपेक्षा ठेवणार.
टीम इंडियाचे अनुभवी फंलदाज अपयशी ठरले, तिथे नवशिक्या पृथ्वी शॉकडून (Prithvi Shaw) काय अपेक्षा ठेवणार.
https://www.cricketcountry.com/wp-content/uploads/2018/11/Prithvi-Shaw-ians-2.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/prithvi-shaw.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/prithvi-shaw.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content