सोलापूर: कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटातून सर्वजण सावरत आहेत. राज्यातील धार्मिक स्थळ आता पुन्हा भाविकांच्या गर्दीनं गजबजू लागल्याचं पाहायला...
सोलापूर: कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटातून सर्वजण सावरत आहेत. राज्यातील धार्मिक स्थळ आता पुन्हा भाविकांच्या गर्दीनं गजबजू लागल्याचं पाहायला मिळतंय. आज ( 24 जानेवारी) पुत्रदा एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात 10 महिन्यानंतर आज पहिल्यांदाच मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतेय. जवळपास दोन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. पंढरपूरच्या विठोबा मंदिरातील ऑनलाईन पास नोंदणी पद्धत रद्द केल्याचा परिणाम भाविकांची संख्या वाढण्यात झाल्याचं पाहायला मिळतेय.
पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी असल्याने विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास दोन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. मुखदर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर लांब गेली आहे. कोविड 19 संसर्ग नंतर पहिल्यांदाच पंढरपूरात लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. शनिवार पासूनच पंढरपूरातील भक्त निवास, मठ, धर्मशाळा, लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. 20 जानेवारी पासून ऑनलाईन दर्शन पास सक्ती बंद केल्याने भाविकांनी दर्शनास येण्यासाठी प्राधान्य दिले आहे. भाविकांची संख्या वाढत असल्यानं कोरोनामुळे बिघडलेले आर्थिक चक्र आता व्यवस्थित सुरु होईल, अशी आशा पंढरपूरमधील व्यापारी कपिल देशपांडे यांनी सांगितले.