बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आश्वासन इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सांगल...
बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. यावेळी उरूण इस्लामपूर शहराच्या विविध विकासकामाबाबत सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख व उरुण इस्लामपूर नगरपरिषदेचे नगरसेवक आनंदराव पवार (बापू) व उरूण इस्लामपूर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी शहरातील विकासकामांच्या निधीबाबत सांगली येथे समक्ष भेटून संवाद साधला.
यावेळी इस्लामपूर येथे उभारण्यात येत असलेल्या भाजी मंडई व वाहनतळ विकसित करण्यासाठी 15 कोटी तर शहरातील रस्ते विकासासाठी 10 कोटी निधी राज्य सरकार देईल असे आश्र्वासन ना. एकनाथ शिंदे यांनी दिले. शहरातील भुयारी गटर योजनेला तात्काळ सुरुवात करण्याबाबत योग्य ते उचित आदेश संबधीत विभागाला व अधिकार्यांना देणार असल्याचे संवादादरम्यान एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याचबरोबर शहरातील विकासकामांचा व प्रलंबित कामाचा आढावा घेऊन शहराच्या प्रलंबित कामासाठी व नव्याने सुरु होणार्या विकासकामाबाबत आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल, असेही शेवटी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे इस्लामपूर येथे नव्याने सुरु होत असलेल्या भाजी मंडई, वाहनतळ या कामाला गती मिळणार आहे तर भुयारी गटरचे काम ही आता गतीने सुरु होईल.
................