नवीदिल्लीः 2020 ने जाता जाता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुखद धक्का दिला असून, डिसेंबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) जमा रक्कम एक ...
नवीदिल्लीः 2020 ने जाता जाता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुखद धक्का दिला असून, डिसेंबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) जमा रक्कम एक लाख 15 हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने देशवासीयांना ही गूड न्यूज दिली आहे.
कोरोना संकटामुळे सुरुवातीला संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे; मात्र यानंतर देश हळूहळू अनलॉक होऊ लागला. देशातील अनलॉकनंतर अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने रुळावर येत असल्याचे संकेत जीएसटीच्या जमा रकमेतून मिळत आहेत, असे म्हटले जात आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटीची एकूण जमा रक्कम एक लाख 15 हजार 174 कोटी रुपये असून, जीएसटी संकनलाच्या इतिहासात हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. प्रथम जीएसटी संकलन एक लाख 15 हजार कोटी रुपयांवर गेले असून, यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये एक लाख 13 हजार 866 कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. यामध्ये केंद्र सरकारच्या जीएसटी म्हणजेच जीएसटीची रक्कम 21 हजार 365 कोटी रुपये, तर राज्यांच्या जीएसटी म्हणजेच जीएसटीची रक्कम 27 हजार 804 कोटी रुपये आहे. याचप्रमाणे एकूण इंटीग्रेटेड जीएसटीची रक्कम 57 हजार 426 कोटी रुपये आहे. यातील आठ हजार 579 कोटी रुपये सेस वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात एकूण 87 लाख जीएसटी रिटर्न दाखल करण्यात आले. केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहिनुसार, रेग्युलर सेटलमेंट अंतर्गत ’आयजीएसटी’तील 23 हजार 276 कोटी रुपये ’सीजीएसटी’चे 17 हजार 681 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याप्रमाणे डिसेंबर महिन्यातील केंद्र आणि राज्य सरकारचा जीएसटी अनुक्रमे 44 हजार 641 कोटी रुपये आणि 45 हजार 485 कोटी रुपये आहे.
जीएसटी संकलनात 12 टक्के वाढ
डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मधील जीएसटी संकलनात 12 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये आयात ’जीएसटी’त 27 टक्के तर देशांतर्गत व्यवहारातील ’जीएसटी’त 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना संकटातही ऑक्टोबर 2019 मध्ये जीएसटी संकलन एक लाख पाच हजार 155 कोटी रुपये आणि नोव्हेंबर 2019 मध्ये ’जीएसटी’चे संकलन एक लाख चार हजार 963 कोटी रुपये झाले होते, तर डिसेंबर महिन्यात ’जीएसटी’चे विक्रमी संकलन झाले.
ःःःःःःःःःःःःःःः