246 इच्छुकांची माघारः 87 ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 662 उमेदवार निवडणूक रिंगणात कराड / प्रतिनिधी ः कराड तालुक्यातील 104 ग्रामपंचायती पैकी उमेदव...
246 इच्छुकांची माघारः 87 ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 662 उमेदवार निवडणूक रिंगणात
कराड / प्रतिनिधी ः कराड तालुक्यातील 104 ग्रामपंचायती पैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 17 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 104 ग्रामपंचायतीतील 1024 उमेदवारांपैकी 246 उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर 1662 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बिनविरोध ग्रामपंचायतीमध्ये गोटे, वाघेश्वर, विरवडे, कामथी, टाळगाव आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कराड तालुक्यातील 104 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. सकाळपासूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची लगबग सुरू होते. दुपारी तीन पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यामध्ये 104 पैकी 17 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर काही अंशता बिनविरोध झाल्या. यामध्ये कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, महारुगडेवाडी, पाचुंद, गोटे, वसंतगड, हणबरवाडी, विरवडे, अंबवडे या ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या.
तालुक्यातील 104 ग्रामपंचायतीसाठी 1024 सदस्य संख्या असून आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यापैकी 246 जागा बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये हजारमाची 5, कामथी 7, किरपे 7, येणके 9, ओंड 2, खुबी 2, संजयनगर 9, शहापूर 8, वाघेश्वर 6, म्हासोली 7, लटकेवाडी 5, गमेवाडी 3, साकुर्डी 1, भोळेवाडी 5, साळशिरंबे 1, महारूगडेवाडी 7, शेवाळवाडी 4, शेळकेवाडी 1, सवादे 6, शेवाळवाडी-उंडाळे 2, पाडळी 1, घोगाव 4, टाळगाव 9, गोटेवाडी 1, भुरभुशी 7, शिवडे 5, भवानवाडी 4, अंबवडे 5, खालकरवाडी 2, हरपळवाडी 3, वराडे 1, आबईचीवाडी 6, खराडे 2, नवीन कवठे 1, गोळेश्वर 2, खोडजाईवाडी 5, वाठार 2, कोळे 1, बामणवाडी 2, पाचुंद 5, गोटे 11, वसंतगड 9, नांदलापूर 1, भरेवाडी 3, काले 4, चौगुलेमळा 5, उंडाळे 9, अक्काईचीवाडी 3, विरवडे 11, वाघेरी 1, कोडोली 6, गोवारे येथील 1 अशा 246 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठी 1662 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.