उस्मानाबाद नगरपालिकेचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर उस्मानाबाद/प्रतिनिधी : तब्बल 18 वर्षांपासून अनुकंपा धारकांना नियुक्ती देण्यास उस्मानाबाद नगर...
उस्मानाबाद नगरपालिकेचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर
उस्मानाबाद/प्रतिनिधी : तब्बल 18 वर्षांपासून अनुकंपा धारकांना नियुक्ती देण्यास उस्मानाबाद नगरपालिका टाळाटाळ करत असल्याचा बेजबाबदारपणा दलित मित्र शंकर खुने यांनी चव्हाट्यावर आणला आहे.
प्रसिद्धीला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालि
का आणि जिल्हा प्रशासनाकडून पात्र अनुकंपा धारकांची प्रतीक्षा सूची तयार केलेली नाही. नगरपालिकांमध्ये अनुकंपा धारकाच्या रिक्त जागा असतानाही त्याप्रमाणे अनुकंपा धारकांना गेल्या 18 वर्षांपासून नियुक्ती दिली नाही. आस्थापना शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी हे शासन निर्णयाचे आदेशाचे आणि सूचनांचे पालन करत नसल्याने अनुकंपा धारकांना नियुक्ती पासून वंचित राहावे लागत आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी अनुकंपाधारक यांनी अनेक वेळा विनंती उपोषणा सारखा मार्ग अवलंबून देखील प्रशासनाने यासंदर्भात ठोस भूमिका घेतलेली नाही. नगरपालिका कडून रिक्त जागा असतानाही चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती शासनाकडे दिल्याने अनुकंपाधारकावर अन्याय होत आहे. येत्या 10 दिवसात पात्र अनुकंपाधारक यांना नियुक्ती न दिल्यास न्यायमार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दलित मित्र संघाचे राज्य सचिव तथा अधिकारी-कर्मचारी संघटनेचे राज्य का