देवळाली/प्रवरा प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील लग्न समारंभात दुधा पासुन बनवलेली रबडी खाल्याने तब्बल 200 ते300 जणांना जेवनातुन...
देवळाली/प्रवरा प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील लग्न समारंभात दुधा पासुन बनवलेली रबडी खाल्याने तब्बल 200 ते300 जणांना जेवनातुन विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.विषबाधेत सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे.तर सहा जणांची प्रकृती चिंताजणक असल्याने त्यांच्यावर लोणी, नगर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, टाकळीमियाँ ता.राहुरी येथे दत्ताञय काळे यांच्या मुलीचा रविवारी विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. कोल्हार ता.राहता येथील नवरदेव होता. काळे व कडसकर या विवाहासाठी मोठा समुदाय उपस्थित होता. लग्नविधी नंतर जेवणावळी करण्यात आली.दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लग्न समारंभात जेवण केलेल्या अनेकांना जुलाब उलट्याचा ञास होवू लागला.उलटी ,मळमळ,चक्कर येवुन अनेक जण जमिनीवर कोसळले असता स्थानिक नागरीकांनी १०८ रुग्णवाहिनीस संपर्क करुन बाधीत रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. 108 डाॅ रणसिग,चालक लक्ष्मण काळे, यांनी रुग्णांना विविध रुग्णांलयात दाखल करण्यास आले. टाकळीमियाँ मधील 150 रुग्णांना राहुरी कारखाना येथील विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे.50 ते 60 मुलांना विषबाधेचा ञास झाला आहे. इम्राम मुसा पठाण, जावेद बेग,धुव्र प्रशांत अँथनी या लहान मुलांवर तर कैलास चोथे, आचारी मोहन मोरे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना राहुरी कारखाना येथिल नर्सिग होम, लोणी येथील प्रवरा हाॅस्पिटल, राहुरी ग्रामिण रुग्णालय,राहुरीतील लहान मुलांचे डाॅ,प्रकाश पवार,डाॅ नेहे,डाॅ वने,डाॅ म्हस्के तसेच डाॅ संदिप कुसळकर आदींच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तेथील डाॅक्टरांनी बाधित रुग्णावर उपचार केले.यावेळी नर्सिग होमचे वैद्यकीय अधिकारी डाॅ काशिनाथ लहारे, प्राचार्य डाॅ व्हि एस कड,डाॅ किशोर वाघमारे, अक्षय निकम, एम डी स्टॅप सिस्टर जऱ्हाड सरोदे,डाॅ,अश्विन दिघोरे,अक्षय कस्तुरवार, प्रतिक शवंते,कार्तिकी आघाव, स्नेहल घाडगे,शिवानी लव्हाळे,काजल मोडवे, रुचिका भागवत, प्रिया बोधले, वाॅचमन अश्पाक सय्यद, विजय गवळी, भगवान कोबरणे,प्रविण बारहाते अदिंनी मदत केले. यावेळी लहान मुले व वृध्दांचा या विवाह समारंभात अदिक सहभाग होता.
दुध पुरवठा करणारा तो कोण?
राहुरी तालुक्यात गेली दोन दिवसापुर्वी कुकडवेढे येथे दुध भेसळ करण्यारयावर अन्न प्रशासन विभागाने धडक कारवाई करुन दुध भेसळीत वापरणारे साहित्य जप्त केले आहे. तरभेसळ युक्त दुध जागेवर नष्ट केले आहे.टाकळीमिया येथिल लग्न समारंभातील स्वयपाकातील रबडी करण्यासाठी भेसळ युक्त दुधाचा पुरवठा तर केली नाही ना?अशी शंका अनेक जणांनी व्यक्त केली आहे. तो दुध पुरवठा करणारा कोण याचा शोध प्रशासन घेणार का ?