हैदराबाद : जागतिक कोरोना संकटामुळे बदललेल्या परिस्थिती बाहुबली अभिनेते राणा दग्गुबाटी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित-बहुभाषी चित्रपट ...
हैदराबाद : जागतिक कोरोना संकटामुळे बदललेल्या परिस्थिती बाहुबली अभिनेते राणा दग्गुबाटी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित-बहुभाषी चित्रपट ' हाती मेरे साथी' चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करताना ट्वीटरद्वारे राणा म्हणाले, " नवीन वर्षात. नवीन जीवन शैलीत हाती मेरे साथी, अरण्य आणि ' कादन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात घेवून येणार आहोत." यापूर्वी चित्रपट संक्रांतीला प्रदर्शित होणार होता.
हाती मेरे साथी चित्रपटाचे प्रभू सोलोमन यांनी दिग्दर्शन केले आले. चित्रपटाची निर्मिती इरोज नाउ या संस्थाने केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. तेलुगूत चित्रपटास 'अरण्य ' तर तमिळ मध्ये ' कादन ' असे नाव देण्यात आले आहे. स्वतः राणा दग्गुबाटी यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वतःचा आवाज दिला आहे. चित्रपटात श्रीया पिळगावकर यांनी देखिल काम केले आहे. हत्ती तसेच वन्यजीव सृष्टीचे रक्षण एका माणूस कशा प्रकारे करतो यावर चित्रपटात भाष्य केले आहे. सेव्ह दि फॉरेस्ट- वन-वन्यजीव संवर्धन अशी चित्रपटाची संकल्पना आहे. हाती मेरे साथी 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता मात्र जागतिक कोरोना संकट आणि देशव्यापी संचारबंदीमुळे प्रदर्शित झाला नाही. 15 ऑक्टोबर पासून देशात पुन्हा एकदा चित्रपटगृह सीमित प्रमाणात सुरु झाले आहेत. राणा दग्गुबाटी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित विराट पर्वम् चित्रपटाची नवीन झलक 14 डिसेंबरला सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली. विराट पर्वम् हा चित्रपट 1990 साली घडलेल्या आंध्रप्रदेशातील नक्सक्षवादी चळवळीतील सत्य घटनांवर आधारित असून राणा डॉ रवी शंकर ऊर्फ कॉम्रेड रवन्नाची भूमिका साकारत आहेत. एका विशेष चित्रफिती द्वारे विराट पर्वम् मध्ये राणा दग्गुबाटी यांच्या पात्राची ओळख करून दिली आहे.वेणू उडगुला दिग्दर्शित चित्रपटात अभिनेत्री प्रियामनी, नेविथा पेथूराज, नंदिता दास आणि अभिनेत्री साई पल्लवी देखील काम करणार असून चित्रपटाची निर्मिती राणा यांचे वडील सुरेश दग्गुबाटी आणि एसएलव्ही सिनेमा यांच्या संयुक्त विध्यमाने केली आहे. एस एस राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटाद्वारे भल्लालदेवच्या रूपात राणा घरोघरी पोहचले आहेत. 2017 पासून राणा दग्गुबाटी रुपेरी पडद्यापासून दूर आहे. नुकतेच त्यांनी हाऊसफुल 4 मध्ये छोटीशी भूमिका बजाविली. तसेच एनटीआर यांच्या जीवन चरित्रात त्यांनी चंद्रबाबू नायडू यांची भूमिका साकारली. बाहुबली चित्रपटास देशव्यापी प्रतिसाद प्राप्त होण्यामागे राणा दग्गुबाटी यांचे विशेष योगदान आहे. राणा दग्गुबाटी आणि करण जोहर यांच्यात भेट झाल्यानंतर बाहुबली चित्रपटास हिंदीत प्रस्तुत करण्यात आले. राणा दग्गुबाटी प्रथितयश निर्माते आणि माजी खासदार डी रामा नायडू यांचे नातू असून वडील सुरेश दग्गुबाटी देखील मोठे निर्माते तसेच चित्रपट व्यवसायी आहेत. लहानपणापासून चित्रपटाच्या वातावरणात वाढलेल्या राणा यांनी अभिनेते होण्यापूर्वी अनेक क्षेत्रात कार्य केले. शेखर कामुला यांच्या लीडर चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयाची सुरवात केली तर बाहुबली आणि गाझी अटॅक चित्रपटाद्वारे त्यांना राष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष अभिरुची असणा-या राणा यांनी अनेक अभिनव प्रकल्प आणि बहुभाषी साहित्यावर काम केले आहे. कोरोना संकट आणि देशव्यापी संचारबंदीच्या काळात राणा आणि मिहिका बजाज यांचा नुकताच विवाह देखील झाला आहे.