कोपरगाव/शहर प्रतिनि धी : तीन गुन्हेगार स्वरूपाच्या व्यक्तीनी संगनमत करून सदरील युवकास दारु पिवुन विनाकारण शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण क...
कोपरगाव/शहर प्रतिनि
धी : तीन गुन्हेगार स्वरूपाच्या व्यक्तीनी संगनमत करून सदरील युवकास दारु पिवुन विनाकारण शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यास लोखंडी कोयत्याने मारहाण केली. त्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही गुन्हेगाराला जेरबंद केले.
याबाबत सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून, 31/12/2020 रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास टिळकनगर कोपरगांव येथे उमेश गोरख देसाई (वय 29 वर्षे रा.टिळकनगर,कोपरगांव) यास तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग, अनिल माधव वैरागळ,ओम सुनिल कोपरे (सर्व रा.टिळकनगर,कोपरगांव) यांनी संगनमत करुन दारु पिवुन विनाकारण शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच त्यास जिवे मारण्याच्या उद्देशाने अनिल वैरागळ याने उमेश देसाई यास दोन्ही हातानी पकडुन धरले तर तुषार दुशिंग याने लोखंडी कोयत्याने डोक्यावर मारहाण करताना उमेश देसाई याने डावा हातमध्ये घातल्याने हातावर कोयत्याचा वार बसुन जबर दुखापत झाली. दरम्यान ओम कोपरे याने उमेश देसाई यांचे आई-भाऊ यांना लाथाबुक्याने मारहाण केली. वरील तिघांनी उमेश देसाई यांची मोटारसायकलचे (एमएच-17.सीसी-0841) शिट पेटवुन नुकसान केले. उमेश देसाई यांचे घरावर दगडफेक केली. सदर घटनेतील गुंड तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग यांची राहत असलेल्या व आसपासचे परिसरात दहशत असल्याने उमेश देसाई यांनी त्यास घाबरुन काल रोजी फिर्याद दिली नाही. शनिवार रोजी उमेश देसाई यांचे फिर्यादीवरुन तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग, अनिल माधव वैरागळ, ओम सुनिल कोपरे (सर्व रा.टिळकनगर कोपरगांव) यांचे विरुध्द कोपरगांव शहर पो.स्टे.मध्ये भादवि.307,435,323,504, 506, 427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग याचेविरुध्द मोठया स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्याचे कोपरगांव शहर व परिसरात मोठी दहशत आहे. त्याचेविरुध्द वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होताच पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सहा.पोलीस निरीक्षक दिपक बोरेस, पोकॉ.काटे, पोकॉ.थोरात, पोना.कोरेकर, पोकॉ.शिंदे, स.फौ.ससाणे, पोकॉ.खारतोडे आदीनी आरोपी तुषार राजेंद्र दुशिंग व ओम सुनिल कोपरे यांना लागलीच खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्हयात जेरबंद केले आहे.