जिंतूर : जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे बामणी पोलिसांनी एक लाख 39 हजार 300 रुपयांचा गुटका पकडला.बामणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ...
जिंतूर : जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे बामणी पोलिसांनी एक लाख 39 हजार 300 रुपयांचा गुटका पकडला.बामणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंगी (भां) येथे एकजण गुटका विक्री करत असून त्याने मोठ्या प्रमाणात गुटक्याची साठवणूक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
बामणी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.31) दुपारी मिळालेल्या माहितीवरून सावंगी भांबळे येथील एका घरासह शेतात छापा टाकला. त्यावेळी तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात गुटका आढळून आला. पोलिसांनी त्या गुटक्याची मोजदाद केली. तब्बल एक लाख 39 हजार रुपयांचा गुटका यावेळी तेथे असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तेथील एका व्यक्तीस बामणी पोलिसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई सहाय्क पोलिस निरीक्षक कल्पना राठोड यांच्यासह कर्मचारी मनोड राठोड, बाळू जोगदंड, जगदिश चोपडे, सहाय्यक फौजदार मोईनोद्दीन पठाण, पवार, चालक श्री. अकमार, यांनी केली. दरम्यान, सहाय्यक फौजदार मोईनोद्दीन पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.