$type=ticker$snippet=hide$cate=0

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 485.90 कोटीच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजनेची सन 2021-22 च्या प्रारुप आराखडा मंजुरीची बैठक सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्र...

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजनेची सन 2021-22 च्या प्रारुप आराखडा मंजुरीची बैठक सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत 2021-2022 जिल्हा वार्षिक योजनेसाठी 140 कोटींच्या वाढीव मागणीसह 485.90 कोटींच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने  मान्यता दिली.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आज झालेल्या आयोजित बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
सन 2021-22 साठी राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 140 कोटींच्या वाढीव मागणीसह 404.49 कोटींची, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 79.83 कोटी तर आदिवासी क्षेत्र बाह्य उपयोजनेसाठी 1.58 कोटी इतक्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मान्यता देण्यात आली. आयत्या वेळच्या विषयामध्ये उंब्रज, ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धनाने ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे, मौजे मारुल हवेली, ता. पाटण व कोपर्डे हवेली, ता. कराड येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे व विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव बा. सी. मर्ढे यांच्या मेर्ढे, ता. सातारा या गावास क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव, सिध्देश्‍वर देवस्थान मारुल हवेली, वडजाई देवी देवस्थान वडजल, ता. माण, श्री जोम मल्लिकार्जुन देवालय वाघावळे ता. महाबळेश्‍वर या स्थळांना क वर्ग यात्रा स्थळांचा दर्जा देण्याबरोबर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण कामाबाबत तसेच सन 2019-20 च्या मंजूर आराखड्यातील तांत्रिक मान्यता प्राप्त असलेली प्रास्तावित कामे व सन 2020-21 च्या आराखड्या बाहेरील कामे आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत सभागृहात सदस्यांसोबत चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. तसेच विविध विभागांकडील 2020-21 जिल्हा वार्षिक योजनेमधील नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर सभागृहात चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10849,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17469,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14777,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 485.90 कोटीच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 485.90 कोटीच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी
https://1.bp.blogspot.com/-lltnDPtC-n4/YBP7xLArp7I/AAAAAAABntI/O-nyvarf-6k8TbN-aKnh-wMdNUF6ZhFtACLcBGAsYHQ/s320/29-8.jpeg
https://1.bp.blogspot.com/-lltnDPtC-n4/YBP7xLArp7I/AAAAAAABntI/O-nyvarf-6k8TbN-aKnh-wMdNUF6ZhFtACLcBGAsYHQ/s72-c/29-8.jpeg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/48590.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/48590.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content