39 ग्रामपंचायतीमध्ये राजकीय धूराळा उडणार जामखेड/प्रतिनिधी ः तालुक्यातील निवडणूक लागलेल्या 49 ग्रामपंचायतीपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, ...
39 ग्रामपंचायतीमध्ये राजकीय धूराळा उडणार
जामखेड/प्रतिनिधी ः तालुक्यातील निवडणूक लागलेल्या 49 ग्रामपंचायतीपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी, झिक्री, राजेवाडी, सोनेगाव, सातेफळ, धोंडपारगा या 10 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 39 ग्रामपंचायतींमध्ये राजकीय भावकी आमनेसामने राहणार आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ग्रामपंचायतीमधील काही वार्ड बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सर्व ग्रामपंचायतींच्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.
राजकीयदृष्टया महत्त्वाची असलेल्या सोनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून रूक्मिनी बिरंगळ, रूपाली बिरंगळ, सुनिता बोलभट, मनिषा वायकर, सूमन मिसाळ, मारूती बोलभट, विलास मिसाळ, आश्रु खोटे,अमोल वायकर हे नऊ सदस्य बिनविरोध करण्यात आले आहेत. सरपंच गणेश लटके यांच्या नेतृत्वाखाली सातेफळ ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली असून गणेश अजिनाथ लटके, रमेश ज्योती भोसले, काशिनाथ शाहू सदाफुले, जयश्री बापु थोरात, अलका मेघराज पाचरणे, नंदा डिगांबर खुपसे, जनाबाई मोहन भोसले. या सात सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. शाहू खूपसे, अजिनाथ लटके, सोमनाथ लटके, पांडुरंग झांबरे, शांतीलाल झांबरे, बाळासाहेब भोसले, यांनी बिनविरोध निवडीसाठी विशेष प्रयत्न केले.
बाजार समितीचे महादेव डूचे, उद्योगपती शहाजी अण्णा डूचे यांच्या मार्गदर्शनाखाली खूरदैठण ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून अश्विनी बाळासाहेब ठाकरे, निर्मला गोकुळ डूचे, दादासाहेब शहाजी डूचे, मंदाबाई विठ्ठल डूचे, मनीषा अविनाश ठाकरे, हनुमान कुंडलिक देवकाते, सुनीता मोहन डूचे या सात सदस्यांचा बिनविरोध मध्ये समावेश आहे. खूरदैठण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी महादेव डुचे, शहाजी डुचे, भीमराव डुचे, विशाल डूचे, गणेश डुचे, भाऊसाहेब ठाकरे, संजय डुचे, गहिनाथ इंगळे, विजयकुमार डुचे, अंकुश सांगळे, अॅड. ऋषीकेश डुचे, मोहन डुचे, बाळासाहेब समुद्र, आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
राजेवाडी ग्रामपंचायतीमध्ये धनंजय कुमटकर, दत्तात्रय दळवी, नवनाथ गोरे, सिमा तात्यासाहेब गोरे, पूजा विक्रम गोरे, मंगल मोहन कुमटकर, आरती भाऊसाहेब ढेपे, हे सात सदस्य बिनविरोध करण्यात आले आहेत. त्रिंबक कुमटकर, विक्रम गोरे सर, सरपंच संजय कुमटकर, दादा गोरे, संतोष निंबाळकर, संभाजी कुमटकर, तात्यासाहेब गोरे, हरिष कुमटकर यांनी राजेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. धोंडपारगाव ग्रामपंचायत मध्ये कैलास शिंदे, दत्ता शिंदे, बळीराम शिंदे, अवधुत शिंदे,दादा साळवे, अमोल शिंदे, रवि शिंदे हे सात सदस्य बिनविरोध करण्यात आले आहेत धोंडपारगाव ग्रामपंचायत बिनविरोध प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत शिंदे, सुखदेव शिंदे, गोरख शिंदे व राजेश जाधव यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गायवळ बंधूंनी केले प्रयत्न
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश गायवळ व प्रा सचिन गायवळ, सभापती सूर्यकांत मोरे यांनी गावोगाव बैठका घेत समन्वय घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी मतदारसंघ प्रा. मधुकर राळेभात, किशोर गायवळ, सूरेश भोसले, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे आदी उपस्थित होते. गावविकासासाठी तीस लाख रुपये देतो ग्रामपंचायती बिनविरोध करा आमदार रोहित पवार यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन गटतट सोडून गावविकासासाठी वरील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात झाल्या आहेत.