सातारा / प्रतिनिधी : उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग सूचनेनुसार 27 जानेवारी 2021 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 वा ते 8 वी च...
सातारा / प्रतिनिधी : उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग सूचनेनुसार 27 जानेवारी 2021 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 वा ते 8 वी चे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा जिल्ह्यात 27 जानेवारी पासून इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी चे वर्ग शासनाच्या 15 जून व दि. 10 नोव्हेंबरच्या परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी दिली आहे. परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास त्यांचेविरुध्द दंडनिय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.