सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच...
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच कोरोना मुक्त झालेल्या 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 100 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या अहवालामध्ये :- सातारा तालुक्यातील सातारा 5, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1, अजिंक्य कॉलनी 3, शनिवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, जकातवाडी 1, निगडी 1, मलवडी 1, शिवथर 1, कोडोली 1, मानेवाडी 1, शेंद्रे 1, ठोसेघर 1, रेवंडे 1. कराड तालुक्यातील कराड 1,गोवारे 1, कर्वे नाका 1, मुंढे 1. पाटण तालुक्यातीलमारुल हवेली 2, फलटण तालुक्यातील काळज 1, तरडगाव 1, तामखेडा 2, खुंटे 1, सोमंथळी 1. खटाव तालुक्यातील भांडेवाडी 1, वडूज 1, माण तालुक्यातील पळशी 2, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 2, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 3, वडगाव 1, वाई तालुक्यातील वाई 1, एकसर 1, सिध्दनाथवाडी 1, इतर 2, काळगाव 1 तसेच बाहेरील जिल्ह्यातील विटा 1, मिरज 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना मुक्त झालेल्या 29 रुग्णांना डिस्चार्ज सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 29 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या 100 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 28, फलटण 12, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 100 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.