पुणे : केंद्राने 'सिरम इन्स्टिट्यूट'ला लसींची ऑर्डर दिली असली तरी त्यातील महाराष्ट्रासाठी किती लस मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. राज्...
पुणे : केंद्राने 'सिरम इन्स्टिट्यूट'ला लसींची ऑर्डर दिली असली तरी त्यातील महाराष्ट्रासाठी किती लस मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. राज्याच्या आरोग्य विभागाला केंद्राकडून अद्याप किती लस मिळणार, 'सिरम' ची किती आणि 'भारत बायोटेक'ची किती याची माहिती अद्याप मिळाली नाही, परंतु राज्याने 511 केंद्रांवर लस देण्याची तयारी केल्याची माहिती, राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.
येत्या 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. महाराष्ट्रात सुमारे साडेआठ लाख लाभार्थ्यांनी 'कोविन ऍप' वर लसीसाठी नोंदणी केली आहे.