परभणी/प्रतिनिधी : जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतींपैकी 66 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रो...
परभणी/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतींपैकी 66 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.
जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 30 डिसेंबर होता. तर गुरुवारी (दि.31) उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात 12 हजार 807 उमेदवारी अर्ज वैध ठरले तर 145 अर्ज अवैध ठरले होते. याबरोबरच जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांसह तेथील प्रतिष्ठितांनी पुढाकार घेत निवडणूक नको, गावात सलोखा कायम रहावा यासाठी पुढाकार घेत ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही आले. त्यात परभणी तालुक्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. सेलूत दहा, जिंतूरात 11, पाथरीत चार, मानवतमध्ये दोन, सोनपेठमध्ये पाच, गंगाखेडात दहा, पालममध्ये आठ, तर पूर्णा तालुक्यात सात अशा एकूण जिल्ह्यात 66 ग्रामपंचायती बिनविरोध आल्या.