कराड / प्रतिनिधी : बचत खात्याच्या अकाउंटमधून पेटीएमद्वारे वारंवार 67 हजार रूपये काढून एका महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी कराड शहर पोलिसात अज्...
कराड / प्रतिनिधी : बचत खात्याच्या अकाउंटमधून पेटीएमद्वारे वारंवार 67 हजार रूपये काढून एका महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी कराड शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद स्मिता रविंद्र गुणकी (वय 52 रा. विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, मलकापूर) यांनी शहर पोलिसात दिली.
याबाबत मिळालेली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्मिता गुणकी यांनी सन 2009 मध्ये बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथे त्यांचे नावे बचत खाते उघडले आहे. त्या खात्यातून त्यांचे दर महिन्याला गृहकर्जाचा हप्ता कापून जातो. त्यांनी खात्यातून ऑनलाईन बँकीग पेटीएमद्वारे व्यवहार केल्यास त्यांना मोबाईल मेसेज येत असतो. मार्च 2020 पासून त्यांनी त्यांच्या खात्यात पैसे भरेलेले नाहीत. 13 ऑक्टोंबर 2020 रोजी फिर्यादीचे पती रविंद्र गुणकी यांनी फिर्यादीच्या बचत खात्यात 2 लाख रूपये भरले. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी व 16 ऑक्टोबर 2020 रोजी 2 लाख 4 हजार 500 व 98 हजार 174 असे विम्याकरीता कापून गेले. तसेच फिर्यादी यांनी 30 ऑक्टोबर 2020 रोजी टोल नाका रिचार्ज करीता 485 रूपये तसेच गृहकर्जाचा हप्ता 17 हजार 133 कापून गेला. त्यावेळी त्यांचे बचत खात्यात 51 हजार 657 रूपये शिल्लक राहिले होते. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2020 रोजी मनोहर सोलंकी यांनी घरभाडे म्हणून 11 हजार रूपये फिर्यादीच्या खात्यात भरले होते.
त्यावेळी त्यांच्या खात्यात 13 हजार 149 रूपये अशी शिल्लक रक्कम होती. 1 डिसेंबर रोजी गृहकर्जाचा हप्ता 17 हजार 130 रूपये कापून जाण्याऐवजी 13 हजार 150 रूपये हप्ता कापून गेला व फिर्यादीच्या मोबाईलवर मेसेज आला की, बचत खात्यात शिल्लक रक्कम नाही. म्हणून फिर्यादीने खात्यातील रक्कम कोठे गेली. याबाबत चौकशी करणेकामी बँकेत पुस्तक घेऊन त्यामध्ये इंट्री केली असता समजले की, दि. 26 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत पेटीएमद्वारे अज्ञात इसमाने फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर खात्यातून 67 हजार 585 रूपये काढून फसवणूक केली आहे. याबाबत स्मिता गुणकी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेत.