बंगळुरू : कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यात जिलेटीनच्या प्रचंड स्फोटात 8 जण जागीच ठार झाले आहे. तर अनेक जखमी झाले आहे. एका ट्रकमध्ये हा स्फोट झ...
बंगळुरू : कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यात जिलेटीनच्या प्रचंड स्फोटात 8 जण जागीच ठार झाले आहे. तर अनेक जखमी झाले आहे. एका ट्रकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे तब्बल 35 किलोमीटर पर्यंत धक्के जाणवलेत. बंगळुरूपासून 350 किमी दूर असलेल्या शिमोगा जिल्ह्यातील होनसोडू गावाजवळ गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. एका जिलेटीन कांड्याने भरलेल्या ट्रकमध्ये आणण्यात येत होता. एका
खाणीमध्ये उत्खननादरम्यान स्फोटासाठी हा साठा मागवण्यात आला होता. परंतु, गुरुवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण आणि शक्तीशाली होता की, त्यामुळे शिवमोगा जवळील चिक्कमगलुरु आणि दावणगेरे जिल्ह्याला सुद्धा हादरे जाणवले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, ऑफिस, घरांच्या खाचा फुटल्यात. रस्तांना भेगा सुद्धा पडल्यात. या शक्तीशाली स्फोटामुळे भूकंप झाल्याची जाणीव झाली, परंतु, प्रशासनाने असे वृत्त फेटाळून लावले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट हुनासोडू गावात झाला. एका ट्रकमधून जिलेटीनच्या कांड्या नेण्यात येत होत्या. त्याच दरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात ट्रकमध्ये असलेल्या 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथकांनी धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
पंतप्रधानांनी व्यक्त केली दुःख
शिवमोगामधील या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे स्फोटाची झळ बसलेल्या सर्वांना राज्य सरकार सर्व आवश्यक सहकार्य करत आहे असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.