नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारच्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन पद्धतीद्वारे ...
नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारच्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन पद्धतीद्वारे केलेल्या प्रयत्नांमुळे भारतातील मृत्यूंची संख्या निरंतर घटली आहे, जी आज 1.44 % इतकी आहे. विलगीकरणाची प्रभावी पद्धती, आक्रमक चाचणी पद्धती आणि सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावलीवर आधारित रुग्णांची काळजी घेण्याच्या नियमावलीनुसार कार्यवाही झाल्यामुळे मृत्यूंची संख्या कमी झाली आहे.
देशभरात गेल्या 16 दिवसांमध्ये 300 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारने बारकाईने केवळ कोविड नसण्याकडे लक्ष केंद्रित केले नाही तर मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि कोविडमुळे गंभीर आणि वैद्यकीय गुंतागुंत असलेल्या रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून त्यांचा जीव वाचविण्याकडे लक्ष केंद्रित केले. केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांमधील सहकार्यासह केलेल्या प्रयत्नांमुळे देशभरातील आरोग्यसेवा बळकट होण्यास मदत झाली. प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यू दर (109) सर्वांत कमी असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. रशिया, जर्मनी, ब्राझिल, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि इटली यासारख्या देशांमध्ये प्रति दशलक्ष लोखसंख्येमागील मृत्यूदर बराच अधिक आहे. भारताची सध्याची सक्रिय रुग्णसंख्या 2,23,335 असून भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 2.14 % इतकी आहे. गेल्या 24 तासात 19,299 रुग्ण बरे झाल्यामुळे एकूण सक्रिय रुग्ण संख्येतून 855 रुग्ण कमी झाले आहेत. आकडेवारीवरून गेल्या 24 तासांतील सक्रिय रुग्ण संख्येतील बदल लक्षात येतो. महाराष्ट्रात वाढत्या आलेखानुसार 1,123 वाढीव संख्येची नोंद आहे, तर राजस्थानमध्ये घटता आलेख दर्शवित 672 इतकी संख्या कमी झाल्याची नोंद आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 10,075,950 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 96.42 % पर्यंत वाढला आहे. 79.12 % नव्याने बरे झालेली रुग्ण संख्या ही 10 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील आहे. केरळमध्ये 5,424 रुग्ण कोविडमधून बरे झाल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथे अनुक्रमे 2,401 आणि 1,167 नवीन रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 18,645 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.