परभणी : देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू पक्षांसाठी काळ बनला आहे. हा रोग महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. राज्यात 382 ...
परभणी : देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू पक्षांसाठी काळ बनला आहे. हा रोग महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. राज्यात 382 पक्षांचा मृत्यू झाला. यासोबतच 8 जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकुण 3378 पक्षांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने 100 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 3400 पेक्षा जास्त कोंबड्यांना मारण्यात आले आहे.
एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, परभणीच्या मुरूंबामध्ये मागील आठवड्यात सुमारे 900 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासनाने यानंतर, जिथे कोंबड्यांचा मृत्यू झाला, त्याच्या एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी मारण्याचा निर्णय घेतला होता. परभणीचे कलेक्टर दीपक मुगलिकर यांनी म्हटले की, बुधवारी पक्षांना मारण्यात आले. काल रात्रीपर्यंत 3433 पक्षी मारण्यात आले. त्यांनी सांगितले की, कुप्ता गावातून काही मृत पक्षांचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अधिकार्याने म्हटले, जिल्ह्यात अन्य ठिकाणी अशी प्रतिकूल बातमी मिळालेली नाही. मुरूंबा गावातील रहिवाशी एकदम ठिक आहेत, कुणामध्येही फ्ल्यूचे लक्षण नाही.