सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी आणण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प य...
सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी आणण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातला होता.
अशाच प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी पुढील काळाबाबतची सावधगिरी म्हणून ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ट्विटरकडून निर्णय घेण्यात आला आहे. '@realDonaldTrump' या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटचं जवळून निरीक्षण केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विटरकरडून ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आले. भविष्यात भडकावू ट्विटमुळे अशा प्रकारची कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कारण देण्यात आले आहे.