अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे टेकडीवर नागरे परिवाराच्या वतीने दहा गुंठे जागेवर अवतार मेहेर बाबा नवीन केंद्र उभारण्यात आले असून त...
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे टेकडीवर नागरे परिवाराच्या वतीने दहा गुंठे जागेवर अवतार मेहेर बाबा नवीन केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन मेहेरबाबा ट्रस्ट चे ट्रस्टी डॉ मेहेरनाथ कलचुरी यांच्या हस्ते झाले.यावेळी राज कलचुरी,निंबाळकर,कमल मेहेर,चिराग गहेलेत,आकांक्षा गहेलेथ,पांडुरंग आजबे,अर्चना गिरी महाराज,दत्तात्रय नांगरे,अरविंद नांगरे,रेश्मा शिंदे आदीसह ग्रामस्थ व मेहेरप्रेमी उपस्थित होते.
केंद्रामध्ये २ रूम,स्टेज,मंदिर असून बाबांची प्रतिमा स्थापना करण्यात आली आहे.यावेळी आरती व प्रार्थना करण्यात आली व मेहेरबाबावरील भजने म्हणण्यात आली, आश्रम स्थापन करण्यामागील उद्देश नागरे यांनी सांगितला व प्रेरणा कशी मिळाली हे सांगून आपले अनुभव सांगितले.यावेळी बोलताना कलचुरी म्हणाले या नवीन केंद्रामुळे मेहेबाबाचे कार्य लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल येथे रोज सकाळी प्रार्थना झाल्याने या परिसर पवित्र व प्रसन्न बनेल,या टेकडीवर रम्य परिसर असून केंद्राच्या आवारात सुंदर अशी झाडे लावण्यात आली असून उदबोधक सुविचार येथील भीतीवर लिहले आहेत त्यामुळे मन अजून प्रसन्न होते.कलचुरी पुढे म्हणाले अवतार मेहेरबाबाचे जागतिक पातळीवर प्रकटीकरण होत असून भविष्यात जगातील २४० देशातून मेहेरबाबाचे कार्य चालेल पुढील काही वर्षात बदल घडून जगातील सर्वात मोठे धार्मिक तीर्थक्षेत्र मेहेरबाबाच्या समाधी स्थळ होईल भविष्यात जगातून विविध धर्म,पंथचे लाखो लोक येथे दर्शनासाठी येतील व हे जगातील सर्वात मोठे धार्मिक तीर्थक्षेत्र बनलेले असेल. कलचुरी यांनी बाबाच्या कार्या विषयी सांगतांना पुढे म्हणाले बाबाना अध्यात्मिक ५ गुरु होते.मेहेर बाबांचा जन्म पुणे येथे २५ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला.त्यांचे वडील शेहेरयार मुन्देगरजी ईराणी ईश्वर प्राप्तीसाठी इराण सोडुन भारतात आले होते.मेहेरबाबांचे शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेज व सेंट व्हिन्सेंट कॉलेज येथे झाले.नंतर ते अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले.शिर्डीचे साईबाबा,शिर्डी जवळील साकुरीचे उपासनी महाराज, पुण्याचे हजरत बाबाजान,नागपूरचे ताजुद्दीन बाबा,दौंड जवळील केडगांव बेटचे नारायण महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते.बाबा सर्व जातीधर्मातील लोकांना मानवतेचा संदेश देत होते.सर्वधर्म एकच आहे हा संदेश देत मेहेरबाबा जगभर फिरले.अवतार मेहेरबाबा सर्व धर्मावर प्रेम,सर्व धर्माची पूजा करीत,परंतु आपण कोणत्याच धर्माचे नाही किंवा कोणता नवीन धर्म स्थापन करुन मानवाला मानवा पासुन वेगवेगळे करुन त्यांच्यात भ्रम वाढवु इच्छित नाही अशी मेहेरबाबांची शिकवण होती.