मुंबई/प्रतिनिधीः मुंबईमध्ये रोज राज्यातील इतर जिल्ह्यांमधून तसेच इतर राज्यांमधून वाहने येतात. ही वाहने उभी करण्यासाठी शहरात जागा नाही. मुंबई...
मुंबई/प्रतिनिधीः मुंबईमध्ये रोज राज्यातील इतर जिल्ह्यांमधून तसेच इतर राज्यांमधून वाहने येतात. ही वाहने उभी करण्यासाठी शहरात जागा नाही. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये ही वाहने उभी करावी लागतात. कधी वाहतूक कोंडी होते. बाहेरुन येणार्या प्रवाशांना राहण्यासाठी जागा नाही. ही अडचण दूर व्हावी, यासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येतील, अशी माहिती पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
ठाकरे यांनी मुंबईच्या पुढच्या तीस वर्षांतील समस्यांचा विचार करून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले, की मुंबईच्या इंन्ट्री पॉईन्ट्सजवळ ही इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येतील. या ट्रान्सपोर्ट हबजवळ ही वाहने येऊन थांबतील. त्यानंतर मग मुंबई मेट्रो, बेस्टच्या माध्यमातून या प्रवाशांना मुंबईत प्रवास करता येईल, याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस या कामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीमध्ये फ्लडींग स्पॉटबाबतही चर्चा झाली. पाण्याचा निचरा कसा होईल, यावर काम सुरू आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच, आगामी 30 ते 40 वर्षांचा काळ समोर ठेवून सगळे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मिनी पपिंग स्टेशन सुरू करण्याचाही विचार असल्याचेही ते म्हणाले. पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत असलेले सर्व ओव्हरहेडेड वायर काढून टाकण्यात येणार असून यामागे, मुंबई सुंदर दिसावी असा यामगाचा हेतू असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईचा विकास आणि आगामी 30 वर्षांमध्ये मुंबईकरांसमोर उभे टाकणारे प्रश्न या सर्व गोष्टी समोर ठेवून आदित्य ठाकरे बैठका घेत आहेत. मुंबईचे पालकमंत्री या नात्याने ते मुंबईच्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाय शोधत आहेत.