नवी दिल्ली : 2020 साली विशेषतः जागतिक कोरोना संकटात प्रसार भारतीच्या दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या डिजिटल वाहिन्यांनी जवळपास 100% वाढ नोंदवत ल...
नवी दिल्ली : 2020 साली विशेषतः जागतिक कोरोना संकटात प्रसार भारतीच्या दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या डिजिटल वाहिन्यांनी जवळपास 100% वाढ नोंदवत लक्षणीय कामगिरी केली आहे. 2020 साली न्यूज ऑन एअर अप्लिकेशन 2.5 दशलक्षांपेक्षा अधिक नागरिकांनी वापरले आणि लाईव्ह रेडिओ मार्फत 300 दशलक्षांपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले असून लाईव्ह रेडिओ स्ट्रीमिंग लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे.याशिवाय 1अब्ज इतकी दृश्यमानता आणि 6 अब्जांपेक्षा अधिक डिजिटल प्रेक्षकांचा समावेश आहे.
प्रसार भारतीच्या डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज या वाहिन्यांसोबत ,मराठी बातम्यांची वाहिनी डीडी सह्याद्री आणि डीडी चंदना वरील कन्नड कार्यक्रम , डीडी बांग्लावरील बंगाली भाषेतील बातम्या आणि डीडी सप्तगिरी वरील तेलगु भाषेतील कार्यक्रम या प्रसार भारतीच्या वाहिन्यांचा समावेश पहिल्या दहा वाहिन्यांमधे आहे.डीडी स्पोर्ट्स आणि आकाशवाणी स्पोर्ट्स या वाहिन्यांनी आपल्या धावत्या समालोचनात्मक कार्यक्रमांद्वारे कायमचा (स्थिर) प्रेक्षकवर्ग तयार केला असून प्रसार भारती अर्काईव्ह्ज आणि डीडी किसान हे डिजिटल मंच पहिल्या दहा क्रमांकांत आहेत.
ईशान्येकडील बातम्यांसाठी महत्त्वाचा ईशान्येकडील मोठा डिजिटल प्रेक्षकवर्ग अधोरेखित झाला असून ,आँल इंडिया रेडिओची ईशान्य सेवा ही देखील पहिल्या दहा क्रमांकात आहे आणि त्यांनी एक लाखांचा मैलाचा दगड पार केला आहे.विशेष म्हणजे डीडी आणि एआयआरच्या कार्यक्रमांसाठी स्वदेशी प्रेक्षकांनंतर, पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकाचा डिजिटल प्रेक्षक म्हणून नोंदविला गेला आहे त्याच्या मागे अमेरीका आहे. 2020 सालातील डिजिटल व्हिडिओंमधे सर्वाधिक लोकप्रियता पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी केलेला संवाद, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीची कवायत आणि डीडी नॅशनलच्या 1970 सालच्या जुन्या कार्यक्रमातील शकुंतला देवी यांचा एक दुर्मिळ व्हिडिओ, या कार्यक्रमांना लाभली आहे. प्रसार भारतीने समग्र संस्कृत भाषेतील कार्यक्रमांना समर्पित अशा एका यू ट्यूब चॅनेलला आरंभ केला,ज्यात डीडी आणि रेडिओने तयार केलेल्या संस्कृत भाषेतील कार्यक्रम संपूर्ण देशभरातील डीडी वाहिन्यांवर अपलोड करण्यात आले,जेणेकरून सर्व दर्शकांना त्याचा लाभ सहजपणे घेता यावा. मन की बात ला समर्पित असलेले यू ट्यूब आणि ट्विटर वाहिनीची झपाट्याने वाढ झाली असून, मन की बात ट्वीटर वाहिनीचे 67,000 सदस्य आहेत. यू ट्यूबवर मन की बातचे विविध भाग वेगवेगळ्या हिंदी शिवाय इतर भाषांत उपलब्ध आहे.डीडी, एआयआरवर विविध भारतीय भाषांतील 1500 नभोनाट्य उपलब्ध असून ती डिजीटाईझ करुन आपल्या यू ट्यूब वाहिनीवर उपलब्ध केली जात आहेत.हजारो तासांच्या शैक्षणिक कार्यक्रमांची सामुग्री आणि दूरदर्शन वर्ग विविध भारतीय भाषांमधून आपल्या यू ट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. दुर्मिळ आणि ऐतिहासिक मूल्य असलेली अर्काईव्हल सामुग्री डीडी एअरवर उपलब्ध आहे आणि ती प्रसार भारती अर्काईव्हल यू ट्यूब वाहिनीवर डिजीटल स्वरूपात उपलब्ध करण्यात येत आहे. देशभरातील विविध डीडी आणि आकाशवाणीच्या स्थानकांवर उपलब्ध असलेल्या सांगितीक, सांस्कृतिक, राजनैतिक अशा कार्यक्रमांच्या हजारो ध्वनिफिती एकत्र करण्याचे कार्य करण्यासाठी एक समर्पित चमू जनहितार्थ काम करत आहे.अशाप्रकारे ही सामुग्री शैक्षणिक आणि संशोधनात्मक कामासाठी सार्वजनिकरीत्या उपलब्ध केली जात आहे.