$type=ticker$snippet=hide$cate=0

बाईच बाईची शत्रू

महिलेवर जेव्हा अत्याचार होतो, तेव्हा तो केवळ तिच्या शरीरावर आघात नसतो, तर तिच्या मनावर आघात असतो. शरीरावरच्या जखमा बर्‍या होतात; परंतु मनावर...


महिलेवर जेव्हा अत्याचार होतो, तेव्हा तो केवळ तिच्या शरीरावर आघात नसतो, तर तिच्या मनावर आघात असतो. शरीरावरच्या जखमा बर्‍या होतात; परंतु मनावरचा आघात सहजासहजी जात नाही. महिलेकडे भोगदासी म्हणून पाहण्याचा जो कल आहे, तो बदलल्याशिवाय महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत. केंद्र सरकारने हाथरस प्रकरणानंतर कायदे कडक केले असले, तरी त्यानंतरही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. घरातून मुला-मुलींवर समानतेचे संस्कार केले, तरच मुलींचा सन्मान केला जाईल; परंतु तसे होत नाही. त्यातच एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, तर तिला सन्मानाने जगता येईल,असे वातावरण तयार केले पाहिजे.

 अत्याचार होण्यात तिचा दोष नसतो. हे अगोदर समाजाने समजून घेतले विशेषतः महिलांनी महिलांचे शत्रू होता कामा नये. आपल्या भगिनीवर काय प्रसंग गुदरला आहे, याची कल्पना करून तिला त्यातून बाहेर कसे काढता येईल आणि असे अत्याचार करणार्‍याला जन्माची अद्दल कशी घडेल, यावर महिलांनी भर द्यायला हवा. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना जरब तर बसलीच पाहिजे; परंतु त्याचबरोबर अशा घटनांतून पीडितेला धीर कसा दिला पाहिजे, यावर ङर दिला पाहिजे. सरकारने महिलांवरील अन्याय निवारण्यासाठी महिलांचेच प्रतिनिधित्त्व असलेल्या काही यंत्रणा तयार केल्या आहेत. त्यांनी तरी किमान महिलांना धीर दिला पाहिजे. तिच्यावरील अन्याय दूर केला पाहिजे; परंतु अशा यंत्रणातील महिलाच जर पीडितांवर अन्याय करीत असतील, तर पीडितांनी दाद कुठे मागायची, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अन्याय दूर करता येत नसेल, तर किमान जखमांवर मीठ तरी चोळू नये, एवढे भान नियामक संस्थांच्या प्रतिनिधींनी ठेवले पाहिजे; परंतु देशात गेल्या दहा वर्षांत महिलांच्या अत्याचाराची प्रकरणे घडल्यानंतर काही पुरुषांनी जी वक्तव्ये केली, ती निषेधार्ह आहेच. त्याचबरोबर काही महिलांनीही अत्याचार्‍याला जबाबदार धरण्याऐवजी पीडितांवरच संशय घेतला, हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वेगवेगळ्या सदस्यांनी अत्याचार पीडित महिलांना न्याय देणे आणि त्यांच्या मागे सरकारी यंत्रणा उभे करणे अपेक्षित असताना त्यांनीच पीडितांच्या वागणुकीवर बोट ठेवणे, त्यांचेच कसे चुकले हे सांगणे म्हणजे आपल्या घटनादत्त जबाबदारीपासून पळ काढण्यासारखेच आहे. महिला असूनही महिलांच्या वेदना त्यांना समजल्या नाहीत, असे म्हणावे लागते. पुरुषी मानसिकता या महिलांमध्येही कशी रुजली आहे, हे वेगवेगळ्या उदाहरणावरून दिसते. बाईच बाईची शत्रू  असते, असे जे म्हणतात ना, ते अशा बाबतीत तरी खरे आहे, असे म्हणावे लागेल.

उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महिलेने कोणाच्याही प्रभावाखाली अकाली बाहेर पडायला नको होते. पीडित महिला संध्याकाळी एकटीच बाहेर गेली नसती, तर अशी घटना घडली नसती, असे चंद्रमुखी म्हणाल्या. या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. महिलांच्या वेशभूषा, केशभूषा, संचारावरून त्यांच्यावर बंधने आणली जात आहेत. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. चंद्रमुखी यांनी पीडितेलाच चुकीचे ठरवले. महिलांनी वेळीअवेळी घराबाहेर पडू नये. पीडित संध्याकाळच्या वेळी एकटी बाहेर गेली नसती तर ही घटना घडली नसती, असे त्या म्हणाल्या. महिलेला फोन करून बोलावण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण सुनियोजित होते. फोन आल्यावर पीडित महिला तिथे गेली आणि अशी परिस्थिती उद्भवली, असे चंद्रमुखी देवी म्हणाल्या; मात्र वादग्रस्त वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर चंद्रमुखी देवी यांनी व्हिडिओ जारी करत माफी मागितली; परंतु त्यांच्या माफीला तसा काही अर्थ नाही. आपल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागल्यानंतर चंद्रमुखी यांनी घूमजाव केले असले, तरी आपण या संदर्भात काहीही बोललो नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. आपल्या वक्तव्याचा कुठूनही असा अर्थ निघत असेल, तर ते मी मागे घेईन आणि पीडित कुटुंब आणि महिलांची माफी मागते, असे चंद्रमुखी म्हणाल्या. त्यांनी महिलांच्या हिताबद्दल बोलले पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी वादग्रस्त विधान करून महिलांचा अपमान केला आहे, अशी टीका केली गेली. चंद्रमुखी या कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर कोणते संस्कार झाले, हा मुद्दा येथे महत्त्वाचा नाहीच. त्याचे कारण अशा आयोगावर प्रतिनिधित्व केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनीही असेच अकलेचे तारे तोडले आहेत. महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या सदस्य आशा मिर्गे यांनी महिलांविषयी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. मुली आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांसाठी मुलींचे कपडे तसेच वागणे आणि अयोग्य ठिकाणी जाणे या तीन गोष्टी करणीभूत असतात, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. मिर्गे यांनी आपले हे मत नागपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या युवती शिबिरात व्यक्त केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. महिला आयोगाच्या सदस्यांनी महिलांविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वच अवाक झाले आहेत. महिलांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी महिला आयोग महिलांमागे असतो; मात्र महिला आयोगाचे विचार असे असतील, तर अन्याय झाल्यावर महिलांनी जायचे कुठे, हा सवाल उपस्थित होत आहे.

पहिले महिला धोरण, महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांत धोरण, महिला आरक्षण आदीबाबत महत्वाचे निर्णय घेणारे शरद पवार यांच्या विचारांचे अनुकरण त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्या करीत नसतील, तर अन्यांकडून अशी अपेक्षा तरी कशी धरता येईल? मिर्गे यांनी मुंबईतील शक्तीमील बलात्कार प्रकरण आणि दिल्लीतील निर्भया प्रकरणाची उदाहरणे दिली होती. मुंबईतील पीडित मुलीने शक्तीमिलमध्ये जाण्याची काय गरज होती, दिल्लीतील निर्भयाला मित्राबरोबर चित्रपट पाहण्यासाठी जाण्याची गरज काय होती, असे सवाल त्यांनी केले. गुवाहाटी येथील रस्त्यावर अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचे प्रकरण देशभर गाजले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करायला आलेल्या महिला आयोगाच्या सदस्य अलका लांबा या चर्चेत आल्या. लांबा यांनी पीडित मुलीची आणि तिच्या परिवाराची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुलीची ओळख सार्वजनिक केली आणि सगळीकडून त्यांच्यावर प्रश्‍नांच्या फैरी झडायला लागल्या. लांबा यांना मात्र हे नवीन नाही. राजकारणाचा हा चढता आलेख एकीकडे असताना कौटुंबिक पातळीवर त्यांच्यावर पतीकडून आरोप करण्यात आले आहेत. पति लोकेश कपूर यांनी आरोप केला आहे, की अलका लांबा यांनी त्यांचे घर बळकावले असून लोकेश आणि त्यांच्या आईचा छळ केला आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. अलिकडेच घडलेल्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. महिलांच्या अत्याचाराबाबत काहीतरी ठोस उपाययोजना केली जाण्याची मागणी देशभरातील संवेदनशील नागरिकांकडून सातत्याने केली जात असते. अशातच सध्या छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे एक विधान वादग्रस्त ठरले आहे. त्यांच्या या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5534,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9937,औरंगाबाद,354,क्रीडा,675,दखल,657,देश,4141,नाशिक,773,पुणे,583,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15305,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12386,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3428,विदेश,635,संपादकीय,1458,सातारा,3146,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बाईच बाईची शत्रू
बाईच बाईची शत्रू
https://1.bp.blogspot.com/-KoEtqKrVGkQ/X_hYve1I-uI/AAAAAAABm2o/t3p5gZMf7bU9HVx0ftuanDrKvW9uYQPvACLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-KoEtqKrVGkQ/X_hYve1I-uI/AAAAAAABm2o/t3p5gZMf7bU9HVx0ftuanDrKvW9uYQPvACLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_124.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_124.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content