मसूर / प्रतिनिधी : ऐतिहासिक, पारंपारिक, अध्यात्मिक, क्रीडा आणि राजकीय वारसा लाभलेल्या हणबरवाडी, ता. कराड येथील ग्रामपंचायत निवडणूक राज्याचे ...
मसूर / प्रतिनिधी : ऐतिहासिक, पारंपारिक, अध्यात्मिक, क्रीडा आणि राजकीय वारसा लाभलेल्या हणबरवाडी, ता. कराड येथील ग्रामपंचायत निवडणूक राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, यांच्या नेतृत्वाखाली तसेच सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण क्रीडा सभापती मानसिंगराव जगदाळे, पॅनेल प्रमुख हणमंतराव शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्विवादपणे बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडणूक करून जिल्ह्यातील इतर गावांसमोर हणबरवाडी गावाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सह्याद्री ग्रामविकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व राहिले. हणबरवाडी येथील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हणमंतराव शेडगे यांच्या सह्याद्री ग्रामविकास पॅनेलने सर्व जागांवर बिनविरोध करत बाजी मारली व ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. या प्रसंगी मानसिंगराव जगदाळे यांचे हस्ते सर्व नवनिर्वाचित सदस्य नारायण शंकर शेडगे, जयश्री रांजेंद्र शेडगे, कल्याणी सुनिल घाडगे, संजय मारूती पवार, अमृता किशोर शेडगे, प्रकाश आनंदराव कुंभार, दिपाली अशोक पवार, यशोदा संतोष कोळेकर, दत्तात्रय नामदेव पवार यांच्याबरोबरच निवडणुकीत अर्ज भरूनही माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच हणबरवाडी गावच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिले.