पुणे / प्रतिनिधीः रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेल्या थ्री फेजच्या मीटरचा महावितरणकडे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांप...
पुणे / प्रतिनिधीः रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेल्या थ्री फेजच्या मीटरचा महावितरणकडे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पैसे भरूनही वीज ग्राहकांना मीटर उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यावर पर्याय म्हणून ग्राहकांनी बाजारातून हे मीटर खरेदी करावेत. त्यांची मोफत तपासणी करून देण्याबरोबरच मीटरसाठी मोजलेले पैसे वीजबिलातून वळती करून देण्याची सुविधा महाविरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु बाजारात या मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
बाजारात थ्री पेज मीटरचा तुटवडा असल्याने वीज ग्राहकांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. त्यामुळे वाट पाहण्या पलिकडे ग्राहकांना आता पर्याय राहिलेला नाही. बाजारात सुमारे साडेतीन ते चार हजार रुपयांना थ्री फेज मीटर मिळते; परंतु गेल्या महिन्यापासून अचानक या मीटरला मागणी वाढली आहे. शहरात सध्याच्या घडीला दोन हजाराहून अधिक मीटरची गरज आहे. हे महाविकरणकडे प्रलंबित असलेल्या अर्जावरून स्पष्ट झाले आहे. खुल्या बाजारातही हे मीटर उपलब्ध होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालवधी लागू शकतो, असे व्यापार्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वीजग्राहकांच्या हातात सध्या तरी वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. महावितरणने खुल्या बाजारातून आरएफ थ्रीफेज मीटर खरेदी करण्यास गेल्या महिन्यापासून परवानगी दिली. यापूर्वी अशी परवानगी नव्हती. मागणी वाढल्याने हे मीटर उपलब्ध नाही. ती उपलब्ध होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालवधी लागणार आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. महावितरणकडे मीटर उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. खुल्या बाजारातदेखील तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थीती आणखी एक महिना राहिल, असे अन्य एका विक्रेत्याने सांगितले.