चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील प्रत्येकी तीन व दोन म्हणजेच एकूण पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्याने आ सौ श्...
चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील प्रत्येकी तीन व दोन म्हणजेच एकूण पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्याने आ सौ श्वेताताई महाले यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे चिखली तालुक्यातील चांधई , खोर , मालगनी आणि बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट आणि सिंदखेड या पाच ही ग्रामपंचायती 21 लाखाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये होणाऱ्या उचापती बंद करण्यासाठी बिनविरोध करा ग्रामपंचायती आणि मिळवा 21 लाखांच्या विकास कामांसाठी निधी अशी घोषणाच आ.श्वेताताई महाले यांनी ग्रामपंचायत निवडणूकीचे पडघम वाजू लागले होते त्या वेळीच केली होती . यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात असलेले सामाजिक व राजकीय वातावरण अधिकच घट्ट होईल हा त्या मागचा हेतू होता . सोबत कोरोनाचे संकटाने जनता व प्रशासन त्रस्त आहे . अनेकांचा रोजगार गेला . सर्वांचीच आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सर्वच जन कसोशीने प्रयत्न करीत आहे. कोरोना वाढू नये , कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर अधिकचा ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी , राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये , गावातील वातावरण चांगले रहावे , कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी , निवडणुकीसाठी उमेदवाराकडून होणाऱ्या खर्चाची बचत व्हावी यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होऊन गावागावात एकोपा नांदावा या साठी आ. श्वेताताई महाले यांनी ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते .
त्यासाठी सर्व राजकिय पक्षांच्या लो
कांनी एकत्र येऊन ज्या ग्रामपंचायत निवडणुका बिन विरोध होईल त्या सर्व ग्रामपंचायतीना त्यांच्या पूर्ण कार्यकाळात आमदार निधी सह अन्य आमदारांच्या अखत्यारीत असणाऱ्या आमदार निधी सह इतर शासकीय योजनांमधून 21 लक्ष रुपयांचा निधी विकास कामांसाठी आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून देण्यात येणार आहे . सदर निधी बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत बॉडी सांगेल त्या त्या कामांवर खर्च करण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने चांधई , खोर , मालगनी , पळसखेड भट आणि सिंदखेड या पाच ग्रामपंचायती 21 लाखाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्याने त्या पूर्ण कार्यकाळात तेव्हढा विकास निधी देण्यात येणार आहे.