सातारा / प्रतिनिधी : प्रशासनाच्या वतीने सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन लवकरच केले जाईल. याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने...
सातारा / प्रतिनिधी : प्रशासनाच्या वतीने सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन लवकरच केले जाईल. याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा असून प्रशासनाच्यावतीने पालकमंत्र्यांची वेळ घेऊन उद्घाटन करण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोविड 19 याच्या लसीकरणाबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी माध्यमांतील प्रतिनिधींनी ग्रेड सेपरेटरमधील त्रुटींबाबत जिल्हाधिकारी सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन कधी केले जाणार या प्रश्नावर लवकरच उद्घाटन केले जाईल. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करुन तारीख ठरवली जाईल. या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बोलावणार आहात अशी चर्चा आहे. त्यावर मी अधिक बोलू शकणार नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 8 जानेवारीस खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. हा कार्यक्रम अशासकीय जरी असला तरी त्यास उदयनराजेंच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. त्यानंतर खूद्द उदयनराजे यांनी ग्रेड सेपरेटर जनतेसाठी खूला केल्याची घोषणा केली. त्यानंतर या ग्रेड सेपरेटरमधून वाहतुक सुरु झाली आहे.