$type=ticker$snippet=hide$cate=0

एफआरपी न दिल्याने शेतकर्‍यांनी पेटविले कारखान्याचे कार्यालय

सांगली: साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफआरपी न दिल्याच्या नि...


सांगली: साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफआरपी न दिल्याच्या निषेधार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील कार्यालय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा घडला. आगीत कार्यालयातील कागदपत्रे व फर्निचर जळाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी असा आग्रह धरला होता. यासाठी सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनेही झाली. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केल्यानंतर हंगामाला सुरुवात झाली; मात्र हंगाम सुरू होऊन अडीच-तीन महिने उलटले, तरी अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना दिली नाही. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांना इशारा दिला होता. यानंतरही अपवाद वगळता इतर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना दिलेली नाही. वेळेत एफआरपी मिळत नसल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. पदवीधर निवडणुकीपूर्वी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी एकरकमी एफआरपी द्यायचे कबूल केले होते; मात्र निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे येणार्‍या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5569,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10025,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,617,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15505,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12612,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3471,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3167,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: एफआरपी न दिल्याने शेतकर्‍यांनी पेटविले कारखान्याचे कार्यालय
एफआरपी न दिल्याने शेतकर्‍यांनी पेटविले कारखान्याचे कार्यालय
https://i0.wp.com/www.thodkyaat.com/wp-content/uploads/2017/10/Sugar-Factory.jpg?fit=990%2C557&ssl=1
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_153.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_153.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content