वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातल्याची घटना घडली ...
वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली असून यात एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अद्यापही राजकीय तणाव सुरुच आहे. दरम्यान निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. मात्र, त्याचवेळी ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला.