दादासाहेब काशिद-मसूर /प्रतिनिधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विकास सेवा सोसायटीचे बोगस खाते उघडून विद्यमान अध्यक्षांनी व...
दादासाहेब काशिद-मसूर /प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विकास सेवा सोसायटीचे बोगस खाते उघडून विद्यमान अध्यक्षांनी वरचेवर पैसे काढून, गैरव्यवहार केला असल्याने त्यांना संस्थेच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा आरोप हेळगाव (ता.कराड) येथील सोसायटीच्या सभासदांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तसेच येथून जवळच असलेले खराडे गावातील स्वस्त धान्य दुकान संस्थेच्या नावे चालविण्यास घेऊन ते चालविण्यासाठी लागणारे भांडवल स्वतःच गुंतवून फायदा घेत आहेत. संस्थेच्या अध्यक्ष अथवा सदस्य पदावर असताना संस्थेच्या माध्यमातून लाभाचे काम करता येत नाही असा नियम असतानाही तो धाब्यावर बसूउन स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः मलिदा लाटण्याचे काम सुरू आहे. या बेजबाबदार आणि गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही सभासदांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना संस्थेचे सभासद व माझी तालुका पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ, तसेच उपसरपंच संजय सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद सूर्यवंशी, सोसायटीचे माजी सदस्य रामचंद्र पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंत पाटील, सदाशिव पवार, श्रीमंत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी माहिती देताना शिवाजीराव जगदाळे म्हणाले,येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विकास सेवा सोसायटीचे 23 नंबरचे एक खाते आहे.सदरचे खाते आज आखेर संस्थेच्या रेकॉर्डवर ताळेबंदात ते कुठेही दिसत नाही. परंतु त्या खात्यावर पैसे टाकले जातात आणि त्यातून पैसे काढले ही जात असल्याचे दिसून येत आहे. २०१५ साली सदर खात्यातून त्यावेळचे अध्यक्ष सुनील शंकर पाटील,सचिव रामचंद्र गायकवाड, क्लार्क दत्तात्रेय पाटील यांनी पैसे काडले असल्याचे कागदोपत्री दिसत आहे. मागील काही वर्षापासून संस्थेत चाललेल्या अनागोंदी कारभारामुळे येथील सभासदानी संस्थेचे खातेनिहाय चौकशी व तपासणी व्हावी अशी मागणी सहकार निबंधकाकडे केली होती. त्यानंतर ही बाब पुढे आली आहे.
याबाबत सचिव रामचंद्र गायकवाड आणि क्लार्क दत्तात्रय पाटील यांनीही खात्यावरून पैसे काढले मात्र ते पैसे काढले नंतर आम्ही त्यावेळचे व सध्याचे विद्यमान अध्यक्ष सुनील पाटील यांचेकडे दिले असल्याचे कायदेशीर अपेडेविट करून आमच्याकडे दिले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हेळगाव येथून जवळच असलेले खराडे गावातील स्वस्त धान्य दुकान काही कारणाने बंद झाले होते . ते सुरू करण्यासाठी हेळगाव सोसायटीने पुरवठा शाखेकडे मागणी केली होती.त्यानुसार हेळगाव सोसायटीला चालवण्यास परवानगी मिळाली. मात्र ते चालविण्यासाठी सध्याचे सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सुनील पाटील यांना संपूर्ण जबाबदारी देण्यात यावी असा ठराव सोसायटीत करून घेण्यात आला आहे. त्यानुसार श्री सुनील पाटील हे स्वतःचे भांडवल वापरून सदरचे दुकान चालवत असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला आहे. सध्या काही संचलकांच्या नावे गायी, म्हशीची प्रकरणे केली आहेत.मात्र गायी म्हशी कागदोपत्री घेतल्या आहेत प्रत्यक्षात नाहीत.अस्या बोगस प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.मागील संचलचालक मंडळाने सभासदांना 13% लाभांश जाहीर केला होता.त्यानुसार काही सभासदांना देण्यात आला.मात्र सोसायटीच्या निवडणुकीनंतर राहिलेल्या सभासदांना लाभांश दीला नसल्याने अजूनही ते वंचित राहिले आहेत.अश्या या बेजबाबदार करबाराची चोकशी व्हावी आणि आम्हा सभासदांना न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.